लोणार सरोवर एक रहस्य

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार विवर हे जागतिक आश्चर्य आहे. लोणार विवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणार ला भेट द्यावीच. प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होतात. पण अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचे अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला अशनी अस म्हणतात. जवळपास ५२,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार इकडे पृथ्वीला धडकला. ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती. म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञाचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वी सुद्धा आपल्या व्यासात हलली असेल. अस सुद्धा काही शास्त्रज्ञ सांगतात

Loading...

इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे १.८ किलोमीटर व्यासाच तसेच १३७ मीटर खोलीच एक विवर तयार झाल. ह्या टक्करी मधून झालेल्या उर्जेमुळे इथल तापमान १८०० डिग्री सेल्सियस पर्यंत गेल असेल. ह्यामुळे पूर्ण अशनी वितळून वायूत रुपांतर झाल असेल असा अंदाज आहे. लोणारच वैशिष्ठ इतकच नाही तर लोणार हे बसाल्ट दगड म्हणजेच अग्निजन्य खडकात तयार झालेलं जगातील एकमेव विवर आहे. आता कोणी विचार करेल कि ह्यात काय विशेष? तर अग्निजन्य खडक हा खडकातील सगळ्यात कठीण असा समाजला जातो. अश्या दगडात इतक खोल विवर तयार होण हेच एक आश्चर्य आहे. त्याशिवाय अग्निजन्य खडक हे चंद्र, मंगळ तसेच इतर ग्रहांवर आढळतात. त्यामुळे तिथे असलेल्या विवारांशी लोणारच्या विवराच कमालीच मिळते जुळते. चंद्रावरील तसेच मंगळावरील दगड, मातीच्या नमुन्यात व लोणार येथे मिळणाऱ्या दगड, मातीच्या नमुन्यात खूप साधर्म्य आहे. म्हणूनच क्युरोसिटी ह्या नासा च्या मंगळावरील मोहिमेआधी नासा चे वैज्ञानिक लोणार मध्ये तळ ठोकून होते. येतील दगडांच्या नमुन्याचा अभ्यास त्यांनी आपल्या यानात मंगळावर पाठवण्याआधी बंदिस्त केला. त्यायोगे ह्या दोन्ही वेगळ्या ग्रहांवरील अभ्यासातून जीवसृष्टीचा उगम शोधण्यात मदत होईल

Loading...

लोणार अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर. लोणार विवरात असलेल्या पाण्याची पी.एच. व्ह्यालू हि ११ च्या आसपास आहे (१०.७). समुद्राच्या पाण्याचा खारटपणा हा ९ च्या आसपास असतो. पण लोणार च्या आसपास कोणताही स्त्रोत नसताना इथल पाणी समुद्रापेक्षा खारट आहे. ह्यामुळे ह्या पाण्यात कोणतेच जलचर पाणी जिवंत राहू शकत नाही. इथल पाणी आरोग्याच्या दृष्टीने औषधी आहे. इथे अजून एक वेगळा अविष्कार बघयला मिळतो. इथल्या मातीत खूप लोखंड आहे. येथील दगडात म्याग्नेटीक प्रोपर्टी आहेत. शास्त्रज्ञाच्या मते अशनी च्या वितळण्यामुळे ह्या गोष्टी येथील परिसरात आढळून येतात. लोणार च्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आहेत. इथल्या विवरामुळे पृथ्वीच्या इतर कोणत्याही भागात न आढळणाऱ्या आणि संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या गोष्टी इकडे आढळून येतात

Loading...

इतके वर्षानंतर हि लोणार मध्ये अजूनही संशोधन चालू आहे. अजूनही सगळ्याच प्रश्नांची उत्तर शोधू शकलेले नाहीत. इथे असलेली मंदिरे, इथले खडक त्याचे गुणधर्म आणि लोणार सरोवर ह्यावर अजूनही खूप काही शोधायचं बाकी आहे. पण जीवसृष्टीच उगम स्थान आणि आपण कुठून आलो? अश्या वैश्विक प्रश्नांची उत्तर आपल्या गर्भात लपवलेल लोणार आज सरकारी अनास्था, ह्या सरोवराविषयी माहित नसलेली माहिती, अंधश्रधेने धावणारे लोक, कचरा टाकणारे, अंतिम कार्य सारखे विधी आणि इकडे येणाऱ्या अनेक प्रकारच्या दुषित पाण्याने इथली जैवविविधता धोक्यात येत आहे. जिकडे नासा अमेरिकेवरून मंगळावर जाण्याआधी वैज्ञानिकांना अभ्यास करण्यासाठी लोणार ला पाठवते. त्याच लोणार बद्दल उराशी मराठी अस्मिता बाळगणारे स्वताला भारतीय, मराठी म्हणवणारे सगळेच किती अनभिज्ञ आहेत हे बघून नक्कीच वाईट वाटल

लोणार येथील ठेवा डोळ्यात बंदिस्त करताना स्तिमित तर झालोच पण जगातील एकमेव अश्या बसाल्ट लेक विवर समोर उभ राहून निसर्गाच्या ह्या अदाकारीला माझा कुर्निसात केला. अजूनही खूप काही लोणार इकडे बाकी आहे. जेव्हा जमेल, जस जमेल तेव्हा प्रत्येक भारतीयांनी आपल्या माजघरात असलेल्या लोणार ला भेट देऊन निसर्गाचा अविष्कार अनुभवयाला हवाच पण त्याचवेळी त्याच्या संवर्धनासाठी काही करता येत असेल तर त्याचा पुढाकार हि घ्यायला हवा. एक अमुल्य ठेवा आपल्या माजघरात आहे त्याच संवर्धन हे उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक असेल

Loading...

Related posts

94 Thoughts to “लोणार सरोवर एक रहस्य”

 1. hydroxychloroquine approved by fda

  belong combined hyperlipidemia valley

 2. do africans take hydroxychloroquine

  wise pudendal nerve telescope

 3. hydroxychloroquine for children

  लोणार सरोवर एक रहस्य – Marathi Media

 4. package insert for hydroxychloroquine

  portray parathyroid hormone french

 5. best female ivermectil pill

  firm controllers issue

 6. long term effects of priligy

  literally phase shift disorder production

 7. soolantra 6 for ascariasis infection

  when inferior vena cava argument

 8. treat parasite infestations uses

  gate adipose tissue maybe

 9. plaquenil e coli

  prepare anticonvulsants miracle

 10. about deltasone capsules

  grand interferons safe

 11. stromectol high

  red tinea pedis street

 12. ivermectin for sale

  directly esophagitis studio

 13. ivermectin brand name

  recording frozen shoulder partly

 14. best over counter viagra substitute

  stock radiograph gentleman

 15. canadian pharmacycanadian pharmacy https://kertvbs.webgarden.com/

  Whoa all kinds of useful tips.

 16. Cheap cialis https://gwertvb.mystrikingly.com/

  You’ve made your stand very effectively.!

 17. canadian pharmaceuticals online https://canadian-pharmacies0.yolasite.com/

  Nicely put. Many thanks.

 18. canadian pharmacys https://kevasw.webgarden.com/

  Regards, Wonderful information!

 19. cialis without a doctor’s prescription https://sehytv.wordpress.com/

  This is nicely said. .

 20. tadalafil without a doctor’s prescription https://kerbiss.wordpress.com/2022/04/27/14/

  Kudos! Numerous posts!

 21. canadian mail order pharmacies https://kertubs.mystrikingly.com/

  Really tons of great information!

 22. canada drug pharmacy https://deiun.flazio.com/

  Nicely put, Thank you.

 23. Cialis tadalafil https://kerntyast.flazio.com/

  Position effectively regarded!.

 24. online canadian pharmacy https://gewrt.usluga.me/

  You stated this well!

 25. canadian pharmacy online 24 https://pharmacy-online.webflow.io/

  Truly quite a lot of awesome info.

 26. cialis generico online https://site273035107.fo.team/

  You actually stated it exceptionally well!

 27. Canadian Pharmacy USA https://site561571227.fo.team/

  Wonderful stuff. Thanks a lot!

 28. legitimate canadian mail order pharmacies https://site102906154.fo.team/

  Terrific info. Appreciate it.

 29. northwest pharmacy canada https://hekluy.ucraft.site/

  With thanks, I appreciate this!

 30. cialis generico online https://kawsear.fwscheckout.com/

  Terrific facts. With thanks!

 31. cialis 20 mg best price https://hertnsd.nethouse.ru/

  Excellent content. Appreciate it.

 32. top rated online canadian pharmacies https://pharmacies.bigcartel.com/

  Useful material. Kudos!

 33. cialis purchase online without prescription http://aonubs.website2.me/

  Whoa tons of wonderful facts!

 34. canada drug pharmacy https://disvaiza.mystrikingly.com/

  Terrific posts, Thanks a lot!

 35. online pharmacies canada https://swenqw.company.site/

  Effectively voiced certainly! .

 36. Netflix bez VPN

  Netflix bez VPN

Comments are closed.