दारू सोबत चखना का खाल्ल्या जातोय ?? माहीत आहे का ?

दारू सोबत चखना का खाल्ल्या जातोय ?? माहीत आहे का ?

ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चकणा हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो.

Loading...

स्नॅक्समध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थ तसेच कोल्हापूर भागात तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असे विविध प्रकारांचा समावेश असतो. मात्र नेहमी दारुसोबत चखना खाण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्ही म्हणाल दारुचे सेवन करताना तोंडाला चव येण्यासाठी हे पदार्थ खाल्ले जात असावेत. मात्र हे खरे कारण नाहीये.

Loading...

जेव्हा आपण एखादा खारट वा तिखट पदार्थ खातो. तेव्हा आपल्याला शरीराला पाण्याची गरज अधिक असते. त्याचप्रमाणे जेव्हा दारुचे सेवन करताना हा खारट आणि तिखट चखना खाल्ला जातो तेव्हा शरीरातील द्रव्याचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यामुळे तहान लागते. दरम्यान, दारुचे सेवन करणारे यावेळी पाणी न पिता दारुचे अधिक सेवन करतात. त्यामुळे चखन्यामुळे दारुचे सेवनही अधिक होते. यामुळे साहजिकच दारुची विक्री करणाऱ्यांना याचा फायदा होतो.

Loading...

विषय इंटरेस्टिंग होता म्हणून अधिक माहिती गोळा केली अन लक्षात आले की मीठ ज्याला सोडियम क्लोराईड म्हटले जाते ते दारू पिताना मेंदूला फसवायचे काम करते. म्हणजे दारूची जी आंबूस चव (जी ब्रूविंगमुळे आली असते) ती तशी नसून चांगली आहे हे मेंदूला फसवून सांगते. अन म्हणूनच मनुष्य एकच घोट म्हणत म्हणत लोटपोट होईस्तोवर ढोसतो. अन माणसाचा मा…. होतो.

Loading...

असो, एक करून बघा चाखणा न घेता फक्त दारू प्या अन पहा चव आवडते का? घशातून उतरताना ती तुम्हाला नकोशी वाटते ना? आता वेगळी वेळ निवडा थोडे शेंगदाणे किंवा जे काही खारट चाखण्यात असेल ते घ्या अन दारू टेस्ट करा. घशातून उतरताना एक वेगळा हवाहवासा एहसास ती तुम्हाला देईल. हा सारा बदल मिठामुळे होतो जो वर सांगितल्या प्रमाणे मेंदूला फसवतो.

admin

83 thoughts on “दारू सोबत चखना का खाल्ल्या जातोय ?? माहीत आहे का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *