तोडाचा घाणेरडा वास येत असेल तर काही कायमस्वरूपी उपाय !!

तोडाचा घाणेरडा वास येत असेल तर काही कायमस्वरूपी उपाय !!

काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंध येऊ लागतो. घराबाहेर असताना तो कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी तुम्ही ब्रश करु शकत नाही. तोंड स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये अनेक माऊशवॉशनर उपलब्ध आहेत.मात्र घरातील काही नैसर्गिक पदार्थामुळे तोंडाचा दुर्गंध सहज दूर करता येतो. हे पदार्थ तुम्ही बाहेर जाताना देखील तुमच्या सोबत ठेऊ शकता.

Loading...

अनेक अश्या एक्टीविटीज आहेत ज्या तोडाचा घाणेरडा वास येण्याचे कारण बनते, पण सर्वसाधारण लोकांना या बद्दल माहीती नसते. बहुतेक लोक असे मानतात की तोंडाची स्वच्छता ने ठेवणे आणि चुकीचीचे फूड हैबिट्स तोंडाची दुर्गंधी येण्याचे कारण असते. हे झाले अनेक कारणांच्या पैकी एक कारण पण अजून काही कारणे आहेत जी तुम्हाला माहीत नाहीत.

Loading...

जेवण झाल्यावर ब-याचदा आपल्याकडे बडीसोप खाण्याची पद्धत आहे. ही बडीसोप खाल्याने पचनशक्ती सुधारते. बडीसोप एक उत्तम माऊथफ्रेशनर देखील आहे. बडीसोपमुळे अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते व जंतूंचा नाश होतो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. जेवणानंतर येणारे आंबट ढेकर व अॅसिडीटी बडीसोपमुळे कमी होते. दररोज थोडी बडीसोप चघळल्यामुळे तुमच्या तोंडातून चांगला सुगंध येऊ शकतो.  तुम्हाला बरेच लोक जेवणानंतर बडीसोप किंवा धनाडाळ खाताना दिसतात.

Loading...

जर तुम्ही तोंड उघडे ठेवून झोपत असाल तर तोंडात कोरडेपणा येते. ज्यामुळे थुंक (लाळ) सुकायला लागते त्यामुळे तीव्र दुर्गंधी येते. जेवण जेवल्या नंतर लगेच च्युइंगम चघळल्याने किंवा चावल्याने शुगर आणि काब्स दातांवर जमा होते. यामुळे दातांमध्ये बैक्टीरिया बनतात, जे तोंडाच्या दुर्गंधीचे कारण बनू शकतात. अमेरिकन डेन्टल एसोसिएशन च्या म्हणण्या नुसार वेळेवर जेवण जेवले नाही तर तोंडामध्ये ड्रायनेस येण्यास सुरुवात होते. त्यामुळे तोंडाला वाईट वास येऊ शकतो. सकाळी नाश्ता करण्याच्या अगदी पहिले ब्रश केल्यामुळे अन्न दातांवर जमा होते. यामुळे दातांवर बैक्टीरिया बनतात जे तोंडाची दुर्गंधी चे कारण असते.

Loading...

बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक माऊथ फ्रेशनर्स मध्ये मिंट हा महत्वाचा घटक असतो. खाद्य पदार्थांच्या सजावटी साठी पुदिन्याची पाने तुम्ही वापरु शकता. या पानांच्या ताज्या व थंडगार सुगंधामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकते. या साठी पुदिन्याची काही पाने चघळा अथवा एक कप पुदिन्याचा चहा घ्या. डेजर्ट व बेक केलेल्या पदार्थांमध्ये हा घटक वापरण्यात येतो व कधी कधी मद्या मध्ये फ्लेवर साठी हा पदार्थ वापरण्यात येतो. याला गोडसर व अॅरोमिक फ्लेवर येतो. या बीयांमध्ये अॅरोमा सोबत अॅन्टी बॅक्टेरीयल घटक देखील असल्या मुळे ते चांगले माऊथ फ्रेशनर असू शकते. तुम्ही या बीया चघळू शकता किंवा गरम पाण्यात या बीया भिजत ठेवा व ते पाणी नैसर्गिक पद्धतीने माऊश वॉश करण्यासाठी वापरा.

स्वयंपाका मध्ये लवंग चव व सुगंधा साठी वापरण्यात येते. पुर्वी पासून दात दुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथ वॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते. लवंग मुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्या मध्ये अॅन्टी बॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधी तरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता. वेलची ला एक गोडसर व अॅरोमिक सुगंध येतो. त्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा. किंवा जेवल्यानंतर वेलची टाकलेला चहा घेण्यास हरकत नाही.

जर आपण असे माउथ वॉश युज करत आहात ज्यामध्ये अल्कोहोल चे प्रमाण आहे तर तुम्हाला ड्राय माउथ प्रोब्लेम होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. रोज जास्त प्रमाणात दारू पिण्यामुळे तोंडाची लाळ सुकते. यामुळे तोंडात बैक्टीरिया बनण्यास सुरुवात होते आणि घाणेरडा वास येतो. स्वयंपाका तील कांदा व लसूण या पदार्थांमुळे तोंडाला उग्र वास येतो.पण अन्न पदार्थावर कोथिंबीर टाकल्याने हा दुर्गंध कमी होऊ शकतो. जेवणा नंतर कोथिंबीरींची काही पाने चघळा त्यामुळे तोंडांचा दुर्गंध निघून जाईल. किंवा चिमूटभर मीठा सोबत धणे तव्यावर रोस्ट करा व चघळा.

admin

2 thoughts on “तोडाचा घाणेरडा वास येत असेल तर काही कायमस्वरूपी उपाय !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *