टायरचा रंग काळाच का असतो ? कारण माहित आहे का ?

टायरचा रंग काळाच का असतो ? कारण माहित आहे का ?

मंडळी, जगात कुठेही जा.. कितीही महागडी गाडी घ्या, विमानात प्रवास करा, बाइक चालवा.. पण या सर्वांमध्ये टायरचा  रंग  नेहमी सारखाच असतो. म्हणजे ‘काळा’ रंगच सगळीकडे वापरला जातो. वाहनांच्या फीचर्सबद्दल अनेकदा बोललं जातं, वाहन अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत केलं जातं, पण त्याच्या टायरचा रंग मात्र लाल-हिरवा-पिवळा होत नाही. तो काळाच का राहतो ?

Loading...

मंडळी, म्हटलं तर हा एक निरर्थक प्रश्न आहे किंवा यात खूप मोठा अर्थ असू शकतो. चला तर जाणून घेऊया यामागचं वैज्ञानिक लॉजिक.

Loading...

आजच्या काळातला चाक हा प्रकार म्हणजे पूर्वापार चालत आलेली गोल आकारातील अशी गोष्ट, जी दळणवळण सुखकर बनवते.  लाकडी चाकापासून ते वाहनाच्या स्टीलच्या चाकापर्यंत आपली प्रगती झाली आहे. मोटर सायकल किंवा कार म्हटलं की या चाकांना जबरदस्त घर्षणाचा सामना करावा लागणार, म्हणूनच यातून चाकाला रबरी आवरण चढवलं जाऊ लागलं.

Loading...

साधारण रबरने तयार केलेला टायर घर्षणामुळे लवकर झिजतो.  त्यामुळे पूर्वी त्याला वारंवार बदलावे लागे. पुढे  या समस्येवर संशोधन झाले आणि यातून एक नामी उपाय शोधण्यात आला. रबरी टायर तयार करताना त्यात सल्फर आणि कार्बन मिसळण्यात आले आणि यातून एक मजबूत टायर तयार झाला. हा टायर १ लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर न झिजता पळू शकणार होता.

Loading...

या कार्बन आणि सल्फरमुळेच टायरला त्याचा काळा रंग मिळाला. हा फॉर्म्युला इतका जबरदस्त लागू झाला की याला आजतागायत कोणी बदललेलं नाही. गाडी कितीही स्टायलिश असली तरी टायर मात्र काळाच ठेवला जातो तो याच कारणामुळे…

धन्यवाद !!

admin

30 thoughts on “टायरचा रंग काळाच का असतो ? कारण माहित आहे का ?

Leave a Reply to Lakinival Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *