जाणून घ्या पाणीपुरीबद्दलची अनोखी माहिती 

जाणून घ्या पाणीपुरीबद्दलची अनोखी माहिती 

पाणीपुरी म्हंटलं  कि तोंडाला आपोआप पाणी सुटतं. भारताचं हक्काचं फास्ट फूड म्हणजे पाणीपुरी. हि पाणीपुरी देशात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. बंगाल मध्ये हिला ‘पुचका’, गुजरातच्या कच्छ भागामध्ये  ‘पकौडी’ तर इतर गुजरात मध्ये हिला ‘फुलकी’, दिल्ली, हरियाणा पंजाब मध्ये हि ‘गोलगप्पे’ , हैद्राबाद झारखंड मध्ये ‘गुपचूप’,बैतुल होशंगाबाद, मुल्ताई ह्या भागात ‘पानी कि टिक्की’ तर उत्तरप्रदेश व अलिगढ मधील काही भागात हि ‘पडका’  नावाने प्रसिद्ध आहे.

Loading...

पाणीपुरी हि प्रत्येक भागात वेगवेगळी बनविली जाते. खजूर चे पाणी, तिखा पानी , पुदिन्याचे पानी हे आणि असले भरपूर प्रकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघायला मिळतात. प्रत्येक राज्यात पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. तसे जर पाणीपुरीचे प्रकार एकत्र केलेत तर ३० पेक्षा जास्त वेगवेगले पाणी पुरीचे प्रकार बघायला मिळतील.

Loading...

पण तुम्हाला पाणीपुरीशी जुळलेला इतिहास माहिती आहे का? पाणीपुरी हा पदार्थ जरी भारतीयांचा हक्काचा असला तरी याचे अस्तित्व  प्राचीन असल्याची आख्यायिका आहे. हे तुम्हाला माहित आहे का चला तर मग जाणून घेऊया या मागचा इतिहास.

Loading...

असे म्हणतात कि पांडवांनी द्रौपदीशी लग्न केल्यावर कुंतीने सुनेची परीक्षा घेण्याचे ठरविले. आणि तिला फक्त दोन ते तीन पुर्यांची कणिक आणि घरात उरलेली भाजी देऊन तिला पांडवांचे पोट भरेल असा पदार्थ बनविण्यास सांगितला. द्रौपदीने आपले आहारशास्त्राचे ज्ञान वापरून काहीही खाल्यावर तृप्ततेची जाणीव करून देणाऱ्या पाण्याचा वापर करून ‘पाणीपुरी’ बनविली होती असे म्हणतात.

Loading...

हि तर झाली आख्यायिका पण पाणीपुरी या पदार्थाचा उल्लेख ग्रीक आणि चायनीस इतिहासकारांनी त्यांच्या प्रवासवर्णनांमध्ये केलेला सुद्धा आढळतो. प्राचीन भारतात १६ महाजनपदांपैकी  काठावर वसलेल्या मगध राज्यामध्ये पाणीपुरी असल्याचे पुरावे या इतिहासकारांनी दिलेले होते.

काय आहे कि नाही मज्जेदार माहिती ?  मग शेअर करा हि मजेदार माहिती आपल्या मित्रांसोबत आणि जाणून घ्या अश्याच काही मजेदार गोष्टी.

admin

3 thoughts on “जाणून घ्या पाणीपुरीबद्दलची अनोखी माहिती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *