खऱ्या ‘पॅडमॅन’ ची कहाणी

खऱ्या ‘पॅडमॅन’ ची कहाणी

सध्या ‘पॅडमॅन’ सिनेमाचा बोलबाला तुम्ही सर्वत्र पाहत असाल किंवा ऐकत असाल. हे सर्व ऐकून काहींना प्रश्न देखील पडला असेल कि, ये ‘पॅडमॅन’ है क्या? काहींनी हा सिनेमा पहिला असेल आणि हि फक्त काल्पनिक गोष्ट असेल, असा प्रश्न देखील पडला असेल. मात्र पॅडमॅनची कथा हि सत्य घटनेवर आधारित असून याचा खरा-खुरा हिरो आहे. अरुणाचलम लहान असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. मात्र काबाडकष्ट करून त्यांच्या आईने त्यांना लहानाचे मोठे केले. अरुणाचलम 14 वर्षाचे असताना त्यांना काही कारणास्तव शाळेतून काढून टाकले. यानंतर पुन्हा शाळेत न जाता त्यांनी छोटे-मोठे काम करायला सुरुवात केली. लहानपणापासून खूप खस्ता खात आज त्यांनी आपल्या समाजात मोठे क्रांतिकारी काम केले आहे. त्याचेच फलित म्हणून त्यांची स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन बनवणारी जयश्री इंडस्ट्री मोठ्या थाटात उभी आहे.

Loading...

पत्नीसाठी बनवले स्वस्त पिरियड नॅपकिन

Loading...

1998 मध्ये अरुणाचलम यांचा शांती यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर पत्नी शांती या पिरियड दरम्यान महाग पॅड वापरू शकत नसल्याने न्यूजपेपर वापरायच्या हे जेव्हा अरुणाचलम यांना कळले तेव्हा त्यांनी स्वस्त पॅड बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांना स्वस्त पॅड मशीन बनविण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागली. या दरम्यान त्यांना अनेक अडचणी आल्या मात्र त्यांनी सर्व अडचणींवर मात करत शेवटी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवून ग्रामीण भागातील महिलांसाठी एक क्रांतीची ज्योत पेटवली.

Loading...

जयश्री इंडस्ट्रीजची स्थापना

2006 साली अरुणाचलम यांनी IIT मद्रासमध्ये स्वस्त पॅड बनवणाऱ्या मशीनच्या मॉडेलचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव IITने इनोवेशन फाउंडेशन ग्रासरूट टेक्नोलॉजिकल इनोवेशन अ‍ॅवार्डसाठी पाठवला. हा अ‍ॅवार्ड त्यांनी स्वतःच्या नावावर केला आणि यानंतर या प्रोजेक्टला ताकद मिळत गेली व त्यांनी जयश्री इंडस्ट्रीज स्थापन केली. या कंपनीद्वारे बनवलेल्या 1300 मशीन भारतासह 7 देशात कार्यरत आहेत. एवढंच नाही तर अरुणाचलम यांनी अनेक संस्थांमध्ये भाषण देखील दिले आहे. त्यापैकी आयआयटी बॉम्बे, आयआयएम बंगलोर, आयआयएम अहमदाबाद आणि हॉवर्ड यांचा समावेश आहे.

Loading...

भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार

नाव – अरुणाचलम् मुरुगनंतम्. वय – ५२ वर्षं. राहणार – पप्पनैकेनपुदुर, कोईमतूर, तमीळनाडू.
‘जगातल्या शंभर सर्वांत प्रभावशाली व्यक्तींपैकी एक’ असा ‘टाईम मॅगझिन’नं ज्यांचा गौरव केला, त्या अरुणाचलम् मुरुगनंतम् यांची बाहेरच्या जगात ओळख आहे ती ‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ अशी. अनेक वर्षं हालअपेष्टा सोसून, कष्ट उपसून मुरुगनंतम् यांनी सॅनिटरी नॅपकिन तयार करण्यासाठी यंत्राची निर्मिती केली. हे नॅपकिन बाजारात मिळणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेल्या नॅपकिनांपेक्षा एक-दशांश किमतीत तयार होतात. मुरुगनंतम् यांच्या यंत्रामुळे आज भारतातल्या तेवीस राज्यांमधल्या आणि तेरा देशांमधल्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया पाळीसाठी स्वच्छ नॅपकिन्स वापरू शकल्या आहेत, स्वत: ती तयार करून, विकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकल्या आहेत. अरुणाचलम् मुरुगनंतम्) यांच्या कामाची थक्क करणारी ही खरी कथा.

आजही मुरुगनंतम् त्याच खेड्यात राहतात. घर मात्र दोन मजली आहे. यंत्र वाहून नेण्यासाठी एक जीप घेतली आहे. बाकी कष्ट तेच आणि ध्यासही तोच. अवघड जागी चेंडू बांधून ठेवल्यामुळे प्रकृतीवर मात्र आता परिणाम झाला आहे. पण त्यांच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नाही. मिळालेली अनेक बक्षिसंही बिनमहत्त्वाची. बायको आणि आई घरी परतल्यामुळे ते आता आनंदात आहेत. कधीतरी बिहारमध्ये गेल्यावर कुठल्यातरी गावात कोणी म्हातार्‍या आजी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या यंत्रानं त्यांना कसं जगवलं हे सांगतात. कधी उत्तराखंडातून फोन करून कोणी आई त्यांच्या यंत्रामुळं ती आपल्या मुलीचं शिक्षण करू शकली, हे सांगते. दारुड्या नवर्‍याच्या त्रासापासून – या यंत्रांमुळे मिळणार्या उत्पन्नानं – सुटका करून घेता आली, असं सांगणारी अनेक पत्रं येतात. मुरुगनंतम्‌ना मग आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं.

 

 

 

admin

9 thoughts on “खऱ्या ‘पॅडमॅन’ ची कहाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *