‘रिअल हिरो, या बॉलिवूड अभिनेत्याने ‘मेडिकल स्टाफसाठी’ खुले केले जुहूतील हॉटेल….

क * रोना विषा * णूविरुद्ध लढा देण्यासाठी प्रशासनासह प्रत्येक नागरिक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यात अनेक सेलिब्रिटीही नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. तर काही कलाकार गरजूंपर्यंत जेवण पुरवत आहेत. यामध्ये अभिनेता सोनू सूदने काही दिवसांपूर्वी जीव धो * क्यात घालणाऱ्या डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांच मुंबईतील हॉटेल खुलं केलं. या हॉटेलमध्ये डॉक्टर आणि अन्य कर्मचारी आराम करु शकतात असं त्याने सांगितलं. त्यानंतर त्याने आता पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी त्याने जवळपास ४५ हजार गरजूंना दररोज जेवण पूरविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘इंडिया टीव्ही’नुसार, सोनू सूदने त्याच्या वडिलांच्या शक्ती सागर सूद यांच्या नावाने एक अन्नछत्र सुरु केलं आहे. ‘शक्ती अन्नदानम योजना’, असं त्याच्या अन्नछत्राचं नाव असून या अंतर्गत दररोज मुंबईतील जवळपास ४५ हजार लोकांना जेवण पुरवलं जाणार आहे.
“सध्याच्या घडीला आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्याकडे दोन वेळचं जेवण आणि डोकं झाकायला छप्पर आहे. त्यामुळे आपण सुखात आहोत. पण समाजात असेही काही जण आहेत, ज्यांना दोन वेळचं जेवणं मिळणंही कठीण आहे. त्यामुळे या लोकांच्या मदतीसाठी मी माझ्या वडिलांच्या नावाने एक अन्नछत्र सुरु केलं आहे. या अन्नछत्राच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना जेवण आणि किराणा सामान पुरविणार आहोत. मला आशा आहे, या अन्नछत्राच्या माध्यमातून मी शक्य तितक्या नागरिकांची मदत करु शकेन”, असं सोनू सूदने सांगितलं.
दरम्यान, सोनू सूद केवळ गरजूंची मदतच करत नाहीये. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जनजागृतीही करत आहे. तसंच क्वारंटाइनमध्ये तो घरात काय करतोय याविषयीदेखील तो चाहत्यांशी बोलत आहे.
viagra online reviews buy viagra super active best viagra source