दातदुखीवर रामबाम उपाय

अनेक लोकांमध्ये दातदुखीची समस्या पाहायला मिळते. अचानक होणाऱ्या दातदुखीचा संपूर्ण दिनचर्येवरच परिणाम होतो. अनेकदा दातदुखीमुळे आवडीचे पदार्थ खाण्यावरही बंदी येते. अनेक जण सहन न होणाऱ्या दातदुखीवर एखादी पेनकिलर खातात. परंतु त्याचा तितकाचा फायदा होताना दिसत नाही. दातदुखीवर काही घरगुती उपाय रामबाण ठरतात.

लवंग वापरणे

लवंगात बरेच औषधीय गुण हे असतात. जे बॅक्टेरिया, किटाणूंना नष्ट करतात. अनेकदा दात किडल्यामुळे दुखतो. दुखत असलेल्या दाताखाली लवंग ठेवल्यास दुखणं काही प्रमाणात कमी होतं. लवंगाचं तेलही दुखत असलेल्या दातावर लावल्यास फायदा होतो.

कांदा वापरणे

दातदुखीवर कांदा अतिशय उत्तम सोपा उपाय आहे. जेवणात दररोज कांद्याचं सेवन करणाऱ्यांना दातदुखीची त्रास तुलनेने कमी होतो. कांद्यामध्ये असणारे गुणधर्म दातातील किटाणू नष्ट करतात. दात दुखत असल्यास कांद्याचे काही तुकडे दाताखाली ठेवावेत किंवा कांदा चावावा. काही वेळाने आराम मिळू लागतो.

लसूण

लसूनमध्ये अॅन्टिबायोटिक गुण असतात. लसूनमध्ये अनेक प्रकारचे संक्रमण दूर करण्याची क्षमता असते. लसून बारिक ठेचून तो दाताखाली ठेवल्यास फायदा होतो. लसणाचे तुकडे करु नये, तो ठेचूनच दाताखाली ठेवावा. लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या मीठ लावून, चावून खाल्यानेही आराम पडतो. दातदुखी नसेल तरीही दररोज लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात.

मीठ

कोमट पाण्यात मीठ मिसळून या पाण्याने गुळण्या करणं, हे माउथवॉशचं काम करतं. मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याने दातदुखीपासून आराम मिळतो. गुळण्या करताना मीठाचं पाणी थुंकण्याआधी ते कमीत कमी ३० सेकंद तोंडात ठेवणं गरजेचं आहे.

काळी मिरी पावडर –

थोड्या मीठामध्ये एक चिमटी काळी मिरी पावडर मिसळून दुखऱ्या दातावर लावल्यास आराम पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *