‘लागिरं झालं जी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप !

आज्या व शितलीची प्रेमकहाणी खूप कमी कालावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय झाली होती.पण आता लागिरं झालं जी बघणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

‘लागिरं झालं जी’ नावाची झीमराठी वरील मालिका ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेचे चाहते महाराष्ट्रामधील घराघरात आहेत.

अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सर्व कलाकार ह्याच मालिकेमुळे चांगल्या प्रकारे प्रकाश झोतात आले होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या मालिकेमुळे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना ही रोजगार मिळाला होता.

चांदवडी गावचे नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आज पोहोचलं. मालिकेतील आपले सर्वांचे लाडके कलाकार आज्या, शितली, राहुल्या, भैय्यासाहेब यांची एक झलक बघण्यासाठी गावात प्रचंड गर्दी होऊ लागली. पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली ही मालिका आणि तिचा संस्मरणीय प्रवास अखेर थांबतोय. मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. येत्या 22 जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका सुरु होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *