नावापुढे आडनाव लावत नाही ‘गौरी-शनाया’ ते रजनीकांत पासून हे काही प्रसिद्ध मराठी कलाकार, जाणून घ्या खरी नावे !

हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपण त्यांच्या नावाने ओळखतो आणि त्यांचे पूर्ण नाव आपल्याला माहीत नसते. जसे की गोविंदा, नीलम, तब्बु पण केवळ हिंदीतच नव्हे तर अनेक मराठी कलाकारही आहेत ज्यांचे पूर्ण नाव आपल्याला माहीत नसेल. अशाच काही कलाकारांची माहिती देणारे खास पॅकेज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

31 जानेवारी 1993 साली जन्मलेली सायली मुळची नाशिकची आहे. सायलीने कमी कालावधीत तिचा खास अशा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. एका बनारसी मुलाच्या प्रेमात पडलेली गौरी साळुंखे आणि तिच्यास कुटुंबाभोवती फिरणारी कथा या मालिकेचा गाभा आहे. मालिकेतील गौरीच्या साध्यासरळ रुपाने प्रेक्षकांना चांगलेच मोहित केले आहे. विशेष म्हणजे सायली संजीव हे तिचे पूर्ण नाव नाही. सायली तिच्या नावात केवळ वडिलांचे नाव लावते सायलीचे पूर्ण नाव आहे, सायली संजीव चांदसारकर. आज या पॅकेजमधून आम्ही आपल्यालाठी अशा कलाकारांचे पॅकेज घेऊन आलो आहोत जे त्यांचे नाव पूर्ण न लावता शॉर्टकट वापरतात.

रसिका सुनीलमाझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलचे पूर्ण नाव फार कमी लोकांना माहीत आहे. रसिकाच्या वडिलांचे नाव सुनील आहे पण प्रत्यक्षात रसिकाचे पूर्ण नाव आहे रसिका सुनील धाबडगावकर.

ललित प्रभाकर‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता ललित प्रभाकर तरुणींचा लाडका अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्याच्या फार कमी फॅन्सला माहीत असेल की, ललितचे पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असे आहे.

अजय-अतुल़आपल्या सुरेल स्वरांनी अख्ख्या मराठी जनतेला वेड लावणारे अजय-अतुल हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे नाव अजय गोगावले आणि अतुल गोगावले असे आहे.

रंजनागतकाळातील दिवंगत अभिनेत्री रंजना यांचे पूर्ण नाव रंजना देशमुख असे होते.

रजनीकांत मराठमोळे अभिनेता आणि दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांचे पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. असे म्हणतात की आडनाव न वापरणारे रजनीकांत हे सिनेसृष्टीतील पहिले अभिनेता आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *