रणवीरच्या ‘या’ वागणुकीवर दीपिका नाराज

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी त्याच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. त्याच्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावरही नेटकरी त्याला कायम ट्रोल करत असतात.

त्याचप्रमाणे दीपिका देखील त्याची खिल्ली उडवत असते. ऐले पुरस्कारामध्ये रणवीर आपल्या खास अंदाजात दिसला. ब्लॅक अॅंड व्हाईट पेहराव्यात दाखल झालेल्या रणवीरच्या डोक्यात काळ्या रंगाची टोपी आणि हातात छडी होती.

रणवीरने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंवर दीपिकाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली ‘स्वत:च्या छातीवर माझी पूर्ण ब्रांजरची डबी संपवली आहेस. त्याचा वापर करण्याआधी मला एकदाही विचारल नाहीस.

‘ ब्रांजर म्हणजे स्त्रियांच्या रंगरंगोटीच्या प्रसाधनांपैकी एक आहे. रणवीर लवकरच ‘८३’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘८३’ चित्रपट वर्ल्ड कप १९८३ वर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे.

रणवीर या भूमिकेसाठी अतिशय मेहनत करत आहे.या चित्रपटात रणवीरच नव्हे, तर अभिनेत्री दीपिका पदुकोणही या चित्रपटातून झळकणार आहे. ती लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसेल.

कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *