सभेत कुत्रा घुसला अन् पवार म्हणाले, शिवसेनेची लोकं आली का?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर दौरा करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उस्मानाबादेतील सभेत कुत्रा घुसला अन् त्यानंतर पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उस्मानाबादेत सभा पार पडली. शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून तरी कुत्रा आला. त्यावेळी पवार यांनी लगेच कुत्र्याकडे हात करत ‘शिवसेनेची लोकं आले काय की’ असा उपरोधिक टोला लगावला आणि सभा मंडपात एकच हशा पिकला.

राज्यात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र, धनदांडग्यांना मदत करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. शेती न कळणाऱ्या सरकारला उपाययोजना करता येणार नाहीत.

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *