ह्याला म्हणतात मोठेपणा ! ज्यांचा पराभव केला त्यांच्याच घरी धैर्यशील मानेंची अचानक भेट

महाराष्ट्राला एक प्रगल्भ राजकीय परंपरा आहे. अनेक राजकीय नेत्यांचा पक्षांपलीकडे जात आपआपसांत चांगला संवाद असतो. याच राजकीय परंपरेला अनुसरून कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने हे आज अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या घरी आले.

Loading...

असलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. राजू शेट्टी यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण करुन धैर्यशील मानेंना घरात घेतलं. तर माने यांना फेटा बांधून राजू शेट्टींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्या आईचा आशीर्वाद घेतला.

खासदार माने यांनी अचानक राजू शेट्टी यांच्या घरी भेट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने राजू शेट्टी यांचा तब्बल १ लाख ४ हजार मतांनी पराभव केला होता.

धैर्यशील माने यांनी पायाला हात लावत राजू शेट्टींच्या आईचा आशीर्वाद घेतला. यावेळी, ‘माझ्या मुलानं जसं काम केलं तसं तूही कर’ असा आशीर्वाद राजू शेट्टींच्या आईनं धैर्यशील मानेंना दिला.

गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पक्ष भाजपसोबत होता. पण ही निवडणूक मात्र त्यांनी आघाडीसोबत लढवली. निवडणुकीत हार झाली असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठीचं राजकारण आपण सुरूच ठेवणार आहोत, असं राजू शेट्टी म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...