‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमध्ये घडणार वाईट घटना; संपूर्ण रायगड हादरून जाणार !

सध्या छोट्या पडद्यावर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ह्या मालिकेत पुढील भागामध्ये एक वाईट घटना घडणार असून, आणि त्या घटनेमुळे पूर्ण रायगड हा हादरून जाणार आहे.

Loading...

नवनीत शिरूर चे खासदार अमोल कोल्हे ह्यांची महत्वाची भूमिका असलेल्या ह्या संभाजी मालिकेमध्ये एक वाईट घटना घडणार आहे. कारभाऱ्यांना कडक शिक्षा ही झाल्यानंतर संभाजी महाराज हे थेट सोयरा मातोश्रींना भेटायला त्यांच्या महाली येतात. तुम्ही कारभाऱ्यांना हे कृत्य करण्यापासून का थांबवलं नाहीत, अस संभाजी महाराज मतोश्रींना विचारतात. त्यांची मूकसंमती होती, असेही म्हणतात.

संभाजी महाराज सोयराबाईंना नजरकैदेत ठेवतात. सोयरा मातोश्रींना आपल्या हातातून घडलेल्या ह्या चुकीचा पश्चात्ताप हा होतो.आपल्या हातून एवढी मोठी चूक घडलीच कशी, याबद्दल त्या स्वत:लाच प्रश्न विचारतात. आणि दोषी मानतात. त्यांनी आपल्या महालाचा दरवाजा बंद ठेवला.येसूबाई काकुळतीला येऊन सोयरा मातोश्रींना दरवाजा उघडा म्हणून सांगतात.

पण त्या कोणाचंच ऐकत नाहीत. सोयरा मातोश्रींना आपला भूतकाळ आठवायला लागतो. त्यांनी शंभूराजेंचे केलेले लाड त्यांना आठवतात. त्यामुळे तर त्या जास्त पश्चात्तापाच्या आगीत होरपळायला लागतात.

सोयराबाई फक्त आपले भाऊ हंबीरमामांना भेटतात. तेही मातोश्रींना दोन शब्द सुनावतात. सोयराबाई हंबीरमामांना सांगतात, आता मुक्काम हलवायची वेळ आली. रायगडावर शेवटी ती घटना घडतेच. पश्तात्तापानं होरपळलेल्या सोयराबाई प्राण त्याग करतात. त्यांचा मृत्यू होतो. झाल्या घटनेनंतर रायगड हादरतो. आपण सोयरा मातोश्रींना जास्त बोललो म्हणून असे घडलं याची खंत शंभूराजांना वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...