सावधान! तुम्ही चप्पल घालून बाईक चालवता? भरावा लागेल एवढा दंड

देशभरात 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन मोटर वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई स्वरुपात मोठी रक्कम वसूल केली जात आहे.

Loading...

वाहन परवानाशिवाय गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. नियमांच्या या यादीत आणखी एका नियमाचा समावेश करण्यात आला आहे. जर तुम्हाला पायात चपला घालून वाहन चालवण्याची सवय असेल तर ती वेळीच बदला.

कारण ही सवयदेखील वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या श्रेणीत येत असल्याचं म्हटलं जात आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण कारवाई होऊ नये यासाठी तुम्ही खबरदारी घ्यायला हवी.

तसंच ही सवय तुमचा खिसादेखील रिकामा करू शकते.वाहतुकीच्या नियमानुसार चप्पल किंवा सँडल घालून दुचाकी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. प्रवाशांची सुरक्षा पाहूनच हा नियम तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

नियमानुसार स्लीपर किंवा चप्पल घालून गिअर असणारी बाईक चालवण्यास परवानगी नाही. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते, असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे.

दोन वेळा पकडले गेल्यास 15 दिवसांचा तुरुंगवास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर किंवा चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले गेल्यास तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. सोबत जर स्लीपरसहीत बाईक चालवताना तुम्ही दोन वेळा पकडले गेल्यास तुम्हाला 15 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...