शासनाला एव्हढीच भीक लागली असेल तर वर्षा बंगला भाड्याने द्या- संदीप देशपांडे

राज्य सरकारला एव्हढीच भीक लागली असेल तर वर्षा बंगला भाड्याने द्या, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अशा 25 किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे.

Loading...

हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत. सरकारच्या याच निर्णयावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

स्थानिक पर्यटकांमध्ये हेरिटेज टुरिझम अर्थात गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्या पर्यटनाची टूम आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचं रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं जतन होण्याऐवजी त्यांचं हॉटेलमध्ये रुपांतर करणं दुर्दैवी असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनीही ट्विटरवरुन चिड व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...