वयाच्या 47 वर्षांनंतरही तब्बू अविवाहित, या सुपरस्टार अभिनेत्याला मानते यासाठी जबाबदार

Loading...

अभिनेत्री तब्बूने आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. एक संवेदनशील अभिनेत्री आणि कोणत्याही भूमिकेला तितक्याच ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावले आहे. मात्र वयाच्या 47 वर्षांनंतरही तब्बू अविवाहित आहे. यासाठी तब्बू बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणला जबाबदार मानते. एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला होता. तब्बू आणि अजय देवगण यांची 25 वर्षांपासूनची ओळख आहे. अजय हा आपला चुलत भाऊ समीर आर्याचा शेजारी आणि आपला चांगला मित्र असल्याचे तब्बूने या मुलाखतीत सांगितले होते. आपल्या करियरमध्ये जेव्हा पुढे जाऊ लागली त्यावेळेपासून अजयने आपल्यासोबत असल्याचंही तिने सांगितले.

अजय आणि समीर हे दोघंही आपल्यावर कायम नजर ठेवून असायचे, जिथे जायचे तिथे पाठलाग करायचे. अजयमुळे तर इतर मुलांशी बोलण्याचीही भीती वाटायची असंही तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. जर एखाद्या मुलाने आपल्या बोलण्याचा प्रयत्न केला तर ते दोघंही त्याला मारण्याची धमकी द्यायचे असं तब्बूने या मुलाखतीत सांगितले. दोघंही खूप मस्तीखोर होते आणि आजही अविवाहित राहण्याला फक्त आणि फक्त अजयच जबाबदार आहे असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितले. अजय देवगणशिवाय तब्बूचे नाव साजिद नाडियादवाला आणि नागार्जुन यांच्याशीही जोडले गेले.

तब्बू साजिद नाडियादवाला याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नागार्जुन आणि तब्बू यांच्या अफेअरच्या चर्चाही जोरदार रंगल्या. मात्र या दोघं कधीही एकत्र येऊ शकले नाहीत. नागार्जुन विवाहित होता आणि त्याच्या पत्नीपासून काडीमोड घेण्यासही तयार नव्हता. त्यामुळे भविष्याचा विचार करून नागार्जुनपासून वेगळे होण्याचा तिने विचार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...