लगिर झालं जी ने घेतला रसिकांचा निरोप

सर्व रसिक मित्रा आणि आपल्या लाडक्या मालिकेचे सर्व चाहते वर्ग यांना एक भावुक संदेश मित्रहो आज जरी लागीर झालं जी या मालिकेचा शेवटचा भाग असला तरी ही मालिका काही आपल्या मनातून कधीच जाणार नाही आज शेवटचे tv वर आपल्या लाडक्या मालिकेतील सर्व कलाकारांना बघून खूप वाईट वाटेल कारण या पुढे झी मराठी चॅनेल चालू असणार पण आवडती मालिका मात्र त्यामध्ये नसणार.

Loading...

Television इतिहासात अनेक मालिका आल्या आणि गेल्या पण लागीर झालं जी ही एक अशी मालिका होती की जिचा प्रेक्षक वर्ग हा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे या मालिकेच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो मालिकेने सुरुवाती पासूनच आपले मनोरंजन केले आणि आपल्याला त्या मध्ये काहीच कमी पडून दिले नाही प्रत्येक कलाकारांची acting आणि dialouge कायम स्मरणात राहील

ती म्हणजे पुढील प्रमाणे

1 समाधान मामा – पुष्पे जरा गप बस्तीस का

2 पुष्पा मामी – पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष ( हाताची style लय भारी )

3 ) राहुल्या – भितुय का कोणाच्या बापाला हाय का कोण परत मला फुल्ल कॉन्फिडन्स हाय

4) यास्मिन – जाणे देना शीतल

5) शीतल – शितलीचा नाद म्हणजे आयुष्याततून बरबाद ( आणि तिचे ते गुड लक )

6)अजिंक्य – असा पोरगा मिळत नसतो बघ कारण आज्या one and only one आहे कळलं का

7) भैया साहेब – there u are आणि त्यांची remix english

8) टॅलेंट – नेहमी भैय्या बरोबर असणारा आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारा

9) सचिन – एकच बोलणार ये शांत बसा नाहीतर आमचे आबा कावतील

10 ) जिजी म्हणजे आपल्या वर आई पेक्षा जास्त माया दाखवणारे माणूस हे जिजीचे प्रेम कधीच विसरता येणार नाही सदैव आठवणीत राहील जिजी ची acting

तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे हणमंत फौजी

शीतल चे एकत्र असलेले पवार कुटुंब आणि मालिकेतील अविस्मरणीय क्षण म्हणजेच बेळगाव मध्ये चित्रीकरण झालेलं कसम परेड हे सर्व क्षण म्हणजेच अनुपम्य सुख सोहळाच होता जणू आणि दुसरे म्हणजे आपला लाडका विक्रम फौजी शहीद झालेला दाखवणे.

हा क्षण बघताना तर tv पुढे असणारा आपला समस्त महाराष्ट्र रडला तसेच आपल्या मालिकेने अनेक चढ उतार पाहिले पण एक प्रेक्षक या नात्याने आपण नेहमी पाठीशी राहिलो प्रोत्साहन दिले आज मालिका तब्बल अडीच वर्षे आपल्या मनावर राज्य करून सोडून गेली.

जसे दुःख तुम्हास झाले त्यापेक्षा कितीतरी दुःख मला झाले असो मालिका आहे ती कधीना कधी बंद होणारच ना जशी सुरुवात असते तसा शेवट ही असतो.
आज कितीतरी लोक आपल्या लाडक्या सिरीयल च्या सेट ला भेट देऊन आलेत आणि कलाकारांसोबत फोटो देखील घेतले.

पण काहींचे स्वप्नां हे स्वप्न च राहिले आज मालिका अचानक बंद झाली हे खरं पण मनामधून न भरून येणारी पोकळी निर्माण झालीय तरी तुम्ही सर्वांनी या आपल्या लाडक्या मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल मी विशाल खामकर ( सातारा) आपले आभार आणि धन्यवाद मानतो.

शेवटचं एकच वाक्य लय असत्यात मनमौजी पण लाखात एक माझा फौजी आणि फौजी हा लाखात एक असतो पण फौजिची बायको दहा लाखात एक असतेmiss u लागीर झालं जीआणि सर्व कलाकार मंडळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...