या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पती आहे बॉलिवूडचा खतरनाक व्हिलन!

बॉलिवूड सिनेमांनी आपल्याला एका पेक्षा एक सरस खलनायक दिले आहेत. पण काही अभिनेते असे आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. असाच एक व्हिलन आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.
मोठे-मोठे डोळे आणि चेहळ्यावर असं हास्य ज्यामागची कहाणी समजणं नेहमीच कठीण असतं. जेव्हा अभिनेता आशुतोष राणाचं नाव येत तेव्हा काहीसं असंच चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आज 10 डिसेंबरला आशुतोषचा वाढदिवस. एका ठराविक ढाच्यातून बाहेर पडत आशुतोषनं स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.
वकील होण्याची होती इच्छा
अभिनेता आशुताष राणानं त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात टीव्ही पासून केली होती. मात्र त्याला सुरुवातीपासूनच वकील होण्याची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. बालपणी आपल्या गावातील रामलीला आशुतोष यांनी रावणाची भूमिका साकारत असत. हे पाहिल्यावर त्यांच्या आजोबांनी वाटे की त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करावं. त्यांनी आपल्या नातवाला तसा सल्ला दिला आणि आशुतोष यांनी अभिनयात लक्ष घालायला सुरुवात केली.
सुरुवातीला टीव्ही शो ‘स्वाभिमान’मधून आशुतोष यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. ‘फर्ज’, ‘साजिश’, ‘कभी-कभी’ आणि ‘वारिस’ या सारख्या सिनेमात त्यांनी काम केलं आणि प्रसिद्ध सुद्धा झाले. याशिवाय त्यांनी ‘बाजी किसकी’ हा रिअलिटी शो सुद्धा होस्ट केला आहे.
टीव्हीनंतर त्यांनी 1998 मध्ये बॉलिवूड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. ‘दुश्मन’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यात त्यांनी सायको किलरची भूमिका साकारली होती. ही भूमिका एवढी लोकप्रिय झाली की आशुतोष एक प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जाऊ लागले.
या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर आणि स्क्रिन वीकली पुरस्कारही मिळाला. त्यानंतर संघर्ष या सिनेमातूनही त्यांनी पुन्हा एकदा खलनायक साकरला आणि याही सिनेमासाठी त्यांना बेस्ट व्हिलनचा अवॉर्ड मिळाला.
आशुतोष यांच्या खाजगी जीवनाविषयी फार कमी माहिती त्यावेळी उपलब्ध होती. पण ते लोकप्रिय ठरत गेल्यावर त्यांच्या खासगी जीवनाविषयी बरीच माहिती समोर आली. 2001 मध्ये त्यांनी मराठी सिने अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याशी लग्न केलं.