या कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये होता अनेक वर्षं अबोला, कतरिनाच्या पार्टीत घडले होते असे काही..

या कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये होता अनेक वर्षं अबोला, कतरिनाच्या पार्टीत घडले होते असे काही..

शाहरुख खान आणि सलमान खान यांनी दोघांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली. त्या दोघांनीही एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यांनी करण अर्जुन, कुछ कुछ होता है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची रिल लाईफ केमिस्ट्री जितकी चांगली आहे, तितकीच त्यांची रिअल लाईफमधील केमिस्ट्री देखील लोकांना आवडते.

Loading...

ते खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्यात झालेल्या एका भांडणामुळे सलमान आणि शाहरुख एकमेकांशी कित्येक वर्षे बोलत नव्हते. कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये सेटल व्हायला खऱ्या अर्थाने सलमान खानने मदत केली. सलमान आणि शाहरुखचे कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत 2008 साली जोरदार भांडण झालं होते.

ही पार्टी त्याच कारणामुळे चांगलीच चर्चेत आली होती. त्या काळात सलमान दस का दम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचा तर शाहरुख खान क्या आप पाचवी पास से तेज है या कार्यक्रमाचा होस्ट होता. या पार्टीत सलमान आणि शाहरुख एकमेकांच्या कार्यक्रमाची खिल्ली उडवत होते. पण या मस्करीचे रूपांतर कधी वादात झाले हे पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांना देखील कळले नाही.
सलमानने शाहरुखच्या वाढत्या लोकप्रियतेवरून त्याला टोमणा मारला. त्यावर शाहरुखने सलमानला ऐश्वर्या रायवरून डिवचले आणि त्यामुळेच सलमान प्रचंड भडकला आणि त्यांच्यात जोरदार भांडणं झाली असे म्हटले जाते. या पार्टीनंतर ते दोघे अनेक वर्षं एकमेकांशी बोलत नव्हते. त्या पार्टीत काय काय झाले याचा अंदाज मीडियाने लावला होता. पण सलमान आणि शाहरुखने यावर न बोलणेच पसंत केले.
शाहरुख आणि सलमान या पार्टीनंतर एकमेकांच्या समोर येणे देखील टाळत होते. पण काही काळानंतर त्या दोघांनी आपला राग विसरून पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीला नव्याने सुरुवात केली. ते दोघे आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असून ते एकमेकांच्या चित्रपटांचे देखील सोशल मीडियावर प्रमोशन करताना दिसतात.
आमचे पेज लाईक करा.

Editor

3 thoughts on “या कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये होता अनेक वर्षं अबोला, कतरिनाच्या पार्टीत घडले होते असे काही..

Comments are closed.