‘या’ अभिनेत्यामुळे सलमानचे लग्न झाले नाही

Loading...

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सलमानच्या लग्नाचा विषय पुढे आला आहे. सलमानचे लग्न कधी होणार या एकाच प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्यासाठी अख्खे बॉलीवूड उत्सुक आहे. सलमानने स्वतः या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास आता थोडी तयारी दर्शवली आहे. आतापर्यंत वेगवेगळी उत्तरे देऊन त्याने हा प्रश्‍न टाळला होता. मात्र आता त्याने केलेल्या खुलाशामुळे सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे. कपिल शर्माच्या चॅट शोमध्ये त्याला पुन्हा याच प्रश्‍नाचे उत्तर विचारले गेले होते, तेंव्हा त्याने आपल्या लग्न न होण्याचे कारण चक्‍क संजय दत्त असे सांगितले आहे.

संजय दत्तचे हाल बघून आपल्याला लग्न करण्याचे धाडस झाले नाही, असे उत्तर सल्लू भाईने दिले आहे. आपल्या म्हणण्याच्या स्पष्टीकरणासाठी त्याने संजय दत्तबाबत घडलेला एक किस्साही ऐकवला. संजय दत्तनेच आपल्याला लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र हे सांगत असतानाच संजयला त्याच्या बायकोचा फोन आला आणि तो बोलणे अर्धवट सोडून निघून गेला. त्याचीही हालत बघूनच आपण लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता, असे सलमान म्हणाला. ही आठवण सांगून आपण लग्न न करण्यामागे संजय दत्तच कारणीभूत असल्याचेही सांगितले.

यापूर्वी सलमानची किमान अर्धा डझन अफेअर झाली असतील. त्यामध्ये ऐश्‍वर्या, जॅकलीन फर्नांडिस, कतरिना कैफ, युलिया विंतूर यासारख्या कितीतरी जणींची नावे घेता येतील. मात्र प्रत्येकवेळी थोडे दिवस मनोरंजन झाल्यावर लग्नाचे विषय मागे पडून अफेअरचे ब्रेकअप होते. आता सध्या तरी सलमानचे नाव कोणाही बरोबर जोडले गेलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...