मोहम्मद शमीनं केली कॉट्रेलनची नक्कल,कॉट्रेलन दिलं शमीला हिंदीतून उत्तर!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना भारताने हा एकतर्फी जिंकलाच. परंतु या सामन्यामध्ये चर्चा झाली ती शमीने वेस्ट इंडिजच्या कॉट्रेलच्या फौजी स्टाईल सेलिब्रेशनच्या नकलेची. शमीने त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला व त्याला प्रतिउत्तर म्हणून कॉट्रेलनं सोशल मिडीयावरून त्याला ट्विट करून उत्तर दिले.

Loading...

कॉट्रेलनं शमीला हिंदीतून प्रतिउत्तर दिलं आहे. त्याने रोमन भाषेत हिंदी लिहून शमीने उडवलेल्या खिल्लीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात कॉट्रेल बाद झाला तेव्हा शमीने त्याची नक्कल केली. युझवेंद्र चहलने 30 व्या षटकात कॉट्रेलला पायचित केलं.

शमीने कॉट्रेलची खिल्ली उडवली तेव्हा युझवेंद्र चहल, विराट कोहलीलासुद्धा हसू आवरले नव्हते. शमीने अशा प्रकारे खिल्ली उडवलेलं चाहत्यांना मात्र आवडलं नव्हतं. त्याला ट्रोलही करण्यात आलं. कॉट्रेलनं यावर उत्तर देताना म्हटलं की, खूप मज्जा आली. मस्त गोलंदाजी. नक्कल करणं हा आगाऊपणा आहे. एवढं म्हणत कॉट्रेलनं यावरून कोणताही वाद होण्य़ापूर्वी त्यावर पडदा टाकला.

शेल़्डन कॉट्रेल जेव्हा विकेट घेतो तेव्हा तो सॅल्यूट करतो. यामाध्यमातून जमैकाच्या सुरक्षा दलाला सलामी देत आभार मानतो. वर्ल्ड कपमध्ये त्याची ही जल्लोषाची पद्धत लोकप्रिय झाली आहे. अनेकजण त्याची नक्कल करताना दिसले आहेत. कॉट्रेलनं आतापर्यंत 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...