मोदींसारखा शूर पंतप्रधान आजवर झालेला नाही – उद्धव ठाकरे

मोदींसारखा शूर पंतप्रधान आजवर झालेला नाही,0 अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची रत्नागिरीतील देवरुख येथील सभेत प्रशंसा केली. पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून धडा शिकवणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असल्याचा निर्वाळा देत त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading...


उद्धव ठाकरे हे देवरुख येथे युतीचे उमेदवार विनायक राउत यांच्या प्रचारासाठी आले होते. या मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर प्रचार सभा होती. या सभेसाठी लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूणमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर हेलीकॉप्टर न मिळाल्यामुळे सुरेश प्रभू हे येऊ शकले नाहीत.


सावरकरांनी देशासाठी त्याग केला. त्या सावरकरांना डरपोक म्हटल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. नेहरुंना वीर जवाहरलाल का म्हटले जात नाही, अशी शेरेबाजीही त्यांनी केली.भाजपशी संघर्ष हा तत्वासाठी होता. आम्ही टोकाला गेलो नव्हतो म्हणूनच आज एकत्र आहोत, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं.

तू परदेशात डिग्री घेतली असशील पण तुला संस्कार कुठे आहेत. आमचा उमेदवार तुझ्या पेक्षा कमी शिकला असेल पण तो तुझ्या पेक्षा सुसंस्कारी सुशिक्षित आहे, असं असल्याचे म्हणत स्वाभिमान पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला फटकारले.या मतदार संघाला बॅ.नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू अशा दिग्दज खासदारांची परंपरा आहे. तीच परंपरा या पुढे हि शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी याही निवडणुकीत कायम ठेवायची आहे, असा निर्धार प्रत्येकाने करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...