मुंबईचा ‘हिटमॅन’ जगात भारी ! रचला जगातील कोणत्याही फलंदाजाला न जमलेला इतिहास

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने तुफान फटकेबाजी केली. त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत २८ चेंडूत अर्धशतक ठोकले. न्यूझीलंडने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना रोहितने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. या बरोबरच रोहित शर्माने टी २० क्रिकेटमध्ये जगातील कोणत्याही फलंदाजाला न जमलेला इतिहास रचला.

Loading...

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने २९ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रोहितने टी २० इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. आजच्या खेळीमुळे रोहितच्या टी २० क्रिकेटमध्ये २२७६ धावा झाल्या. त्याने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याला मागे टाकत हा इतिहास रचला.

या बरोबरच कसोटी, एकदिवसीय आणि टी २० अशा तीनही प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत भारतीय खेळाडूना अव्वल स्थान मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कसोटीमध्ये १५,९२१ धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ धावा करून अव्वल आहे.या बरोबरच आंतरराष्ट्रीय टी २० इतिहासात १०० षटकार लगावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला. तसेच संपूर्ण देशभरात रोहित हा दुसरा फलंदाज ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...