‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत राधिका सुभेदार काढणार गुरुनाथची धिंड

असे बोलले जाते कि ह्या विश्वातल्या प्रत्येकाला त्याने केलेल्या चांगले किव्हा वाईट काम केल्याची फळं इथेच भोगावी लागतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ह्या मालिकेमध्ये सुद्धा आता हेच घडणार आहे.

Loading...

आपल्या सुस्वभावी व सदाचारी बायकोला गंडवणारा, तसेच प्रत्येक वेळी तिचा विश्वासघात करणारा गुरुनाथ,हा जो आजवर त्याच्या अक्कल-हुशारीने आपल्या बायकोला राधिकाला फसवून त्याचं कार्य पार पाडत राहिला.

शनाया नावाच्या मुलीवर त्याने प्रेम केलं व तिच्या प्रेमासाठी त्याने आपलं राहत घर, संसार, बायको, मुलगा आई-वडील, मित्र सगळ्यांना तो विसरला. राधिकाच्या प्रेमाचा, विश्वासाचा प्रत्येक वेळी त्याने अपमान केला. तिने त्याला सुधारण्याची संधी देऊनही त्याने शनायाशी दुसरं लग्न केलं.

गुरुनाथ ने राधिकाच्या ऑफिसमधून ३५ करोड चोरले,व तसेच तिला प्रत्येक वेळी त्रास देण्याची एकही संधी त्याने ही चुकवली नाहीये. राधिका हिने मात्र प्रत्येक वेळी ह्या सगळ्या त्रासाला अगदी धैर्याने सामंजस्याने तोंड दिले आहे. परंतु गुरुनाथने केलेले विसरण्याचे नाटक केलं आणि परत एकदा सगळ्यांचा मोठा विश्वासघात हा केला आहे.परंतु आता त्याच्या पापांचा घडा भरला आहे.

राधिकाने गुरुनाथला बायको म्हणून खूप वेळा समजून घेतलं. पण आता तिच्या संयमाचा बांध फुटला आहे. गुरूने केलेल्या चुकांची, त्याने राधिकाला दिलेल्या मनस्तापाची, त्याने केलेल्या विश्वासघाताची, जाणीव त्याला व्हावी म्हणून राधिका त्याला आता शिक्षा देणार आहे आणि हि शिक्षा राधिकाच नाही तर सगळ्या बायका मिळून गुरुनाथला देणार आहेत.

त्याच्यासारख्याच इतर माणसांसाठी जे आपल्या बायकांना फसवतात हि शिक्षा म्हणजे एक वचक ठरेल. राधिकाने आजवर सोसलेल्या दुःखांचा, सहन केलेल्या अपमानाचा हि शिक्षा सूड असेल आणि ती दिल्यानंतर राधिका सुरु करेल आपला एक नवा प्रवास.

होणाऱ्या त्रासाला निमूटपणे सहन न करता त्यांच्या विरोधात आवाज उठवणं, आपलं अस्तित्व घडवून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या बायकांसाठी राधिकाचा हा निर्णय म्हणजे एक आदर्श असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...