महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे ह्यांच्या गाडीला अपघात

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूर नजीक अपघात हा झाला आहे. सुदैवाने हहा अपघातामध्ये आनंद शिंदे सुखरुप पणे बचावले असून गाडीचं मोठं नुकसान झाला आहे.

Loading...

आनंद शिंदेंची प्रकृती स्थिर आहे.मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे इथे पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे यांच्या पायाच्या तळव्याला दुखापत झाली आहे. तर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

इंदापूरमध्ये डॉ अविनाश पाणबुडे यांच्या खासगी दवाखान्यात उपचार करुन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत.दरम्यान अपघाताच्या वेळी आनंद शिंदे यांच्यासोबत गाडीत आणखी चार जण असल्याचं कळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...