मराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री

माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. रिल लाइफमध्ये ऑनस्क्रीन पत्नी राधिकाशी पटत नसलं तरी रिअल लाइफ पार्टनर म्हणजेच त्याची पत्नी सुखदा खांडकेकर हिच्यावर अभिजीतचं जीवापाड प्रेम आहे.
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर सुखदा अॅक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसह तिचे फोटो ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक साडीतला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुखदा खूपच सुंदर दिसते आहे.
हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. नुकतेच तिचं ‘तेरी भी चुप’ नाटक रंगमंचावर आलं आहे. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.
बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही मूळचे नाशिकचे. अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती.
Viagra Italiano wemReormakaw buy cialis pro emamnbus Cheap Generic Cialis