मनिष पांडे दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं.
Loading...
कर्णधार मनिष पांडेच्या नेतृत्वाखाली रविवारी कर्नाटक टीमने ही स्पर्धा जिंकली. या विजेतेपदासोबतच दुहेरी आनंद मनिषच्या आयुष्यात येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्यासोबत तो सोमवारी (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकणार आहे.
मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मनिष व अश्रिता यांचे कुटुंबीय व काही मोजके मित्रमंडळी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.अश्रिता शेट्टी आणि मनीष पांडे हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते, अशी चर्चा होती.
अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अश्रिताने आतापर्यंत पाच चित्रपटांमध्ये काम केलं असून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.