भारत- बांगलादेश ह्यांच्यात झालेल्या सामन्यात दिसला ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा चेहरा

भारतीय संघाने विश्वचषकाच्या सेमी फायनल फेरीत ध़डक मारली. व ह्यानंतर संघावर कौतुकाचा वर्षावच झाला.भारताने बांगलादेश वर २८ धावांनी विजय मिळवला.भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी पार पडलेला सामन्यात विजय हा मिळवला व धड्याक्यात सेमी फायनल मध्ये उडी मारली.

Loading...

बांगलादेश व भारत हा सामना खूप कारणामुळे चर्चेत राहिला.त्या सुपरहिट आजी पाहूस ते मग बांगलादेशचा शेवटचा गडी बाद करण्यासाठी जसप्रीत बुमराहने टाकलेल जबरदस्त चेंडू.अश्या ह्या जबरदस्त सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या चेहऱ्याचीही झलक बघायला मिळाली.

महेंद्रसिंह धोनी आऊट झाल्यावर जेव्हा प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवला तेव्हा त्यात चेहरा नजरेस आला. अन जेव्हा सर्वसामान्य प्रेक्षक धोनी बाद झाल्यावर नेमके कसे व्यक्त होतात, अगदी त्याच प्रकारे तीसुद्धा व्यक्त झाली होती. भारताच्या संघाला सातासमुद्रापार पाठिंबा देण्यासाठी गेलेला हा चेहरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा.

बकुळा नामदेव घोटाळे फेम सोनाली टीव्हीवर दिसताच चाहत्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहायला मिळाला. सामन्याच्या शेवटी भारताच्या क्रिकेट संघाने विजय मिळवल्यानंतर सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती अतिशय आनंदात दिसत आहे. किंबहुना फोटोच्या कॅप्शनमधूनही हेच प्रतित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...