भाजी विकत घेण्यासाठी स्वतःमार्केटमध्ये फिरते ही बॉलिवूड अभिनेत्री, हा घ्या पुरावा

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आणखीन काही. सध्या अशीच एक सेलिब्रेटी पुन्हा चर्चेत आली आहे.त्याला कारणीभूत ठरला तिचा हा खास फोटो. हा फोटो जुना असला तरी पुन्हा एकदा इलियानावर चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

विशेष म्हणजे अभिनेत्रीपैंकी इलियाना डिक्रूज इंटरनेटवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते .तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. मात्र समोर आलेला हा फोटो पाहून तुम्ही आवाक झाल्याशिवाय राहणार नाही. ख-या आयुष्यात अगदी सर्वसामान्यांप्रमाणे ती जबाबदारी पार पाडताना दिसते.

एरव्ही तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूक मुळे ती सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असते. मात्र हा फोटो पाहून चाहते मात्र तिचे कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. फोटोत दिसत असल्याप्रमाणे इलियाना एकटीच इथे भाजी विक्रेत्यांशी मोलभाव करताना पाहायला मिळते.यावेळी जेव्हा मीडिया फोटोग्राफर इलियानाच्या जवळ पोहोचले तेव्हा भाजी खरेदी करण्यात तिला कसलाही कमीपणा वाटला नाही.

विशेष बाब म्हणजे अनेक सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या इलियानासोबत ना भाजीवाला ना सामान्य माणसाने सेल्फी काढला. यावेळी इलियाना विनामेकअप आणि अगदी साध्या लूकमध्ये असल्यामुळे तिला कोणी ओळखलेच नव्हते. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इलियानाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

इलियाना काही दिवसांपूर्वी सेक्स लाईफबद्दल केलेल्या स्टेटमेंटला घेऊन चर्चेत आली होती. इलियाना शिबानी दांडेकरचा शो ‘The Love Laugh Live Show’मध्ये म्हणाली होती की , कदाचित माझ्या विधानाकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं गेलं. असं असू शकत की मी कोणाच्यातरी आणि विधानावर मत व्यक्त केलं असेल जे मला आवडलं असेल. त्यावर मी बोलले असेन की, मी सेक्स एन्जॉय करते आणि त्याच्याकडे वर्कआऊट म्हणून पाहते. मला हे योग्य वाटत नाही.

आपल्या या गोष्टींना विस्तारीतरित्या सांगताना इलियाना डिक्रुझ म्हणाली की, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की, माझ्या मते सेक्स एन्जॉय केलं पाहिजे मात्र त्यामागे भावनादेखील असल्या पाहिजेत. जेव्हा तुमच्यात प्रेम असते तेव्हा सेक्स करणं चांगलं वाटतं. यात दोन आत्मा सहभागी होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...