बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची लेक आहे आईप्रमाणेच ग्लॅमरस, जान्हवी व सारालाही देतेय टक्कर

बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सची चलती पहायला मिळते आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे व आलिया भट यांसारख्या बऱ्याच स्टारकिड्सनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. तर काही स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Loading...

तर असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल टाकलेलं नाही पण सोशल मीडियावर त्यांचे खूप चाहते आहेत. अशीच एक स्टारकिड आहे ती म्हणजे पूनम ढिल्लोनची मुलगी पालोमा ठाकेरिया ढिल्लोन. पालोमा अभिनेत्री पूनम ढिल्लोनची मुलगी आहे. तिचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून असं वाटतं की ती बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी करते आहे. २४ वर्षीय पालोमाचे वडील अशोक ठाकेरिया आहेत. पूनम ढिल्लोन व अशोक ठाकेरिया यांचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. निर्माते-दिग्दर्शक उमेश मेहरा आणि त्यांच्या पत्नीनं होळीच्या निमित्तानं पार्टीचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी पूनम व अशोक यांची भेट झाली होती.

अशोक यांना भेटण्यापूर्वी पूनमचं ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे तिच्या कठीण काळात ते एकत्र आले आणि १९८८ मध्ये लग्न केलं. काही दिवस सगळं काही सुरळीत चालू होतं. पण अशोक पूनमला वेळ देत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढत गेला आणि १९९७ साली ते वेगळे झाले.

पूनम व अशोक यांना दोन मुलं आहेत. त्यात मुलगा अनमोल व मुलगी पालोमा. घटस्फोट झाल्यानंतर पूनम मुलांना घेऊन वेगळी राहू लागली. सिंगल मदर बनून तिनं मुलांचं पालन पोषण केलं.

काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की संजय लीला भन्साळीच्या चित्रपटातून अनमोल पदार्पण करणार आहे.पूनमची मुलगी पालोमा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून नेहमीच ती फोटोशूटमधील फोटो शेअर करत असते.

तिने इंस्टाग्रामवर ३६ हजारांहून अधिका फॉलोव्हर्स आहेत.पूनमसोबतही पालोमा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...