बीडमध्ये एड्सने मृत्यू झाल्याने अंत्यविधीला नकार,अक्षरशा: मृतदेहाला लागले मुंगळे !

आईला एचआयव्ही आजार. मुलालाही तोच आजार. याच आजाराने १२ वर्षीय मुलाचा जीव गेला. त्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. समाजाच्या हातापाया पडूनही कोणीच पुढे न आल्याने दु:ख डोक्यावर घेऊन आईने आपल्या मुलाचा मृतदेह रिक्षात घातला आणि थेट पाली येथील इन्फंड इंडियात आणला.येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून समाजाचा अद्यापही एचआयव्ही बाधितांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला नसल्याचे समोर येते.

Loading...

पोटच्या गोळ्याचा मृतदेह डोळ्यासमोर ठेवून मनिषा गल्लीतील लोकांना अंत्यसंस्कारासाठी विनवणी करीत होती. मात्र, समाजाने मदत करण्याऐवजी नावेच जास्त ठेवली. कोणीच पुढे येत नसल्याने मनिषा खचली होती. काय करावे समजत नव्हते.

अखेर दु:ख पचवून मनिषाने रिक्षा केला आणि त्यात मृतदेह घेऊन थेट पाली येथील इन्फंट इंडिया गाठले. इन्फंटच्या ‘वेदना’ स्मशानभुमित दुपारच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इन्फंटचे दत्ता बारगजे, संध्या बारगजे आदींची उपस्थिती होती.

मृतदेहाला लागले मुंगळे

रात्रीच्या सुमारासच मनोजचा मृत्यू झाला असावा. सकाळी १० पर्यंत त्याला उचलण्यासाठी अथवा अंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे आले नाही. उशिर झाल्याने अक्षरशा: मृतदेहाला मुंगळे लागले होते.

पती मुकादम आहे. मला त्याने सोडले. मला दोन मुले. दोघांचाही मृत्यू झाला. माझ्या लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी विनवणी केली. मात्र, कोणीच पुढे आले नाही. उलट नावे ठेवली. म्हणून रिक्षा करून मुलाचा मृतदेह घेऊन इन्फंटमध्ये आले.

येथे बारगजे दाम्पत्याने आधार देऊन मुलावर अंत्यसंस्कार केले. मला आजार असल्याने परिसरातील लोकांनी खुप त्रास दिला. मी उठून जावे म्हणून माझ्यावर घरावरही अनेकदा दगडफेक केली.

– मनिषा (पीडित महिला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...