बिग बॉस-12’च्या या स्पर्धकाला करण्यात आली होती शारीरिक सुखाची मागणी, 10 वर्षे वयापासून केली कमाईला सुरुवात

Loading...

मराठी अॅक्ट्रेस नेहा पेंडसे बिग बॉस सिझनची 7वी स्पर्धक बनली. नेहाने ‘स्त्री’ चित्रपटाच्या ‘मिलेगी-मिलेगी’ गाण्यावर डान्स करत बिग बॉसमध्ये एंट्री घेतली. यादरम्यान नेहा सलमानसोबत फ्लर्ट करताना दिसली. नेहा सलमानला म्हणाली- जर तुम्ही माझे शेजारी असता तर लाइफ बनली असती. तथापि, नेहाने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे बॅकग्राउंड फिल्मी नव्हते, यामुळे अनेकदा ती कास्टिंग काउचची शिकार झाली. नेहाच्या मते- ”अनेकदा शारीरिक सुखाची मागणी करण्यात आली. परंतु मी नकार दिला. ज्यांनी अॅक्सेप्ट केले, आज त्या शिखरावर आहेत. या फील्‍डमध्ये गॉड फादर असणे जरूरी आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कास्टिंग काउचपासून सुरक्षित व्हाल.”

10 वर्षे वयात केली पहिली कमाई…

नेहा सांगते, ती चाइल्ड आर्टिस्ट होती, यामुळे लहानपणापासूनच तिने पैसे कमावणे सुरू केले होते. 10 वर्षे वयात तिने पहिल्यांदा 500 रुपये कमाई केली होती. ते तिने आपल्या पॅरेंट्सना दिले होते. नेहाने साउथच्या अनेक चित्रपटांत लीड अॅक्ट्रेस आणि त्यानंतर मराठी सिनेमातही काम केले आहे. नेहाला अनेक भाषा अवगत आहेत

अॅक्टिंग फील्डमध्ये आल्यानंतर सहन केले टोमणे…

नेहाच्या फॅमिलीत कुणीही फिल्मी दुनियेशी संबंधित नव्हते. यामुळे तिला खूप काही सहन करावे लागले. नातेवाइकही उलटसुलट बोलू लागले. कारण 20 वर्षांपूर्वी तरुणींनी फिल्म लाइनमध्ये काम करणे चांगले समजले जात नव्हते. नेहा सांगते, ”मला ज्यांच्याकडून खूप टोमणे सहन करावे लागले तेच नातेवाइक आता म्हणतात नेहा माझी कझिन आहे, नेहा माझी बहीण आहे.’

मध्यमवर्गीय कुटुंबातून आली नेहा..

नेहा सांगते की, ती एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आहे. लहानपणापासूनच चित्रपटांत काम करत आली आहे. 29 नोव्हेंबर 198 रोजी तिचा जन्म मुंबईत झाला होता. नेहाचे वडील बिझनेसमन आहेत, तर आई गृहिणी आहे. नेहाला अॅक्टिंग फील्डमध्ये आणण्यात तिच्या आईची मोठी भूमिका होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...