फोटोत दिसणारी ‘या’ चिमुरडीला ओळखले का ? आज आहे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री

कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोत दिसणारी चिमुरडी ही मृणाल आहे. या फोटोत ती अतिशय गोड दिसत असून हा तिचा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

Loading...

सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.मराठी इंडस्ट्रीत सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. यानंतर मृणालने तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं. या मालिकांमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.

मालिकांमध्ये अत्यंत सरळ साधी आणि सोज्जवळ भूमिका साकारणारी मृणाल रिअल लाइफमध्येही तितकीच साधी आहे. वैयक्तिक आयुष्यातही तिने हा आपला साधेपणा जपला आहे. मृणालचा फोन म्हणजे आठवणीचा साचा आहे असे म्हणायला हरकत नाही.

बरेचसे जुने फोटोज तिने फोनमध्ये अजूनही तसेच ठेवले आहेत. तसेच मृणालला गेम्स खेळायला देखील आवडते ती रिकाम्या वेळेमध्ये सेटवर वा घरी दोन डॉटस आणि असे बरेच गेम्स खेळते. गेम्स म्हणजे माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे असे देखील ती म्हणाली. तिच्या फोन बद्दल विचारले असता ती म्हणाली, “फोन म्हणजे माझ्यासाठी सगळं काही”.

माझा नवरा परदेशामध्ये आणि घरचे सगळे नाशिकला असल्याने माझा फोन माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...