प्रत्येकाने आदर्श घ्यावा असा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचा विवाह सोहळा

कीर्तनकार कसा असावा तर..? जो आपले सुविचार लोकांपर्यंत पोहचवणार व स्वतः त्या विचारांवर चालणारा असावा. असेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे जे आपल्या विनोदी कीर्तन शैलीतुन समाजाचे प्रबोधन करत असतात.
ते त्यांच्या कीर्तनातून सप्ताहात विवाह करा नेहमी अशाप्रकारे प्रबोधित करत आले आहे व तीनशे विवाह देखील त्यांनी त्यांच्या कीर्तनात पार पाडले आहेत आणि याच विचारांचा अवलंब करीत त्यांनी स्वतः देखील त्यांच्या जन्मगावी कर्जत येथे वडिलांनी उभारलेल्या भव्य दिव्य माऊली मंदिराच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात आपला विवाह संपन्न केला.
समाजात सध्या विवाह ही प्रतिष्ठा झाली आहे.पैश्याचा अपव्यव टळावा व विधीप्रमाणे विवाह व्हावा अशी महाराजांची विचारसरणी आहे तसेच त्यांच्या आईवडिलांची देखील अशीच इच्छा होती की आपल्या मुलाचा विवाह सप्ताहात व्हावा त्याच विचारसरणीला धरून व आपले तत्व जपत त्यांनी आज अखंड हरिनाम सप्ताहात केशव महाराज उखळीकर यांच्या किर्तनानंतर साधा व विधीप्रमाणे विवाह केला. व तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे.