पैशांसाठी लग्नात नाचणाऱ्यांपैकी मी नाही, जॉनचा बड्या कलाकारांना टोला

Loading...

पैश्यांसाठी कोणत्याही डान्स शो किंवा लग्नात नाचणाऱ्यांपैकी मी नाही असं म्हणत अभिनेता जॉन अब्राहम यानं बॉलिवूडच्या आघाडीच्या सेलिब्रिटींवर टीका केली आहे. ‘मद्रास कॅफे’, ‘सत्यमेव जयते’ , ‘परमाणू’ अशा अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या जॉननं सर्वाधिक मानधन घेणाऱ्या काही अभिनेत्यांवरही टीका केली आहे.

अभिनेत्यानं केवळ अभिनयाकडे, चांगल्या दर्जांच्या चित्रपटाकडे लक्ष द्यावं, प्रेक्षकांना लुबाडून सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत कलाकारांना का यायचं असतं हे मला समजत नाही असा सवाल जॉननं केला आहे. कलाकाराची ओळख त्याच्या कामावरून असते पण, आश्चर्य म्हणजे एखाद्या हिरोचे चित्रपट सारखे फ्लॉप होत असताना तो सलग तिनं वर्षे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत कसा येतो असंही जॉननं म्हटलं आहे. जॉननं या प्रतिक्रियेतून अप्रत्यक्षरित्या अभिनेता सलमान खानवर टीका केल्याचं म्हटलं जात आहे.

तर दुसरीकडे बॉलिवूडमधल्या आघाडीच्या सेलिब्रिटींवरही त्यांनी टीका केली आहे. पैश्यांसाठी लग्नात नाचणाऱ्या सेलिब्रिटींपैकी मी नाही असंही म्हणत जॉननं आपली नाराजी व्यक्त केली नाही. हा टोला इशा अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना होता असंही म्हटलं जात आहे. जॉन सध्या ‘बाटला हाऊस’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...