पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचे आमदार,खासदार देणार एक महिन्याचे मानधन !

राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन या नैसर्गिक आपत्ती साठी देतील आणि हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येईल,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी दिली. या परिस्थितीमध्ये सर्वांनी मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहनही शरद पवारांनी (NCP Sharad Pawar) केलं.

Loading...

पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी ही घोषणा केली. माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीही असा पूर पाहिला नव्हता. यामध्ये सर्वसामान्यांचं मोठं नुकसान झालंय.

शेतीमधील माती वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर राज्य सरकारने तातडीने लोकांना मदत देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. यासाठी सर्वांनी पुढे येऊन गरज करावी, महाराष्ट्राची ही परंपरा आहे, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.

मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाला भेट

सांगली आणि कोल्हापुरातील पूर हटवण्यासाठी केंद्र सरकारही सक्रिय झालंय. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी घेतलाय. हा विसर्ग दोन लाखांहून पाच लाख करण्यात येणार आहे. To

गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येडियुरप्पा या दोघांनाही फोन केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...