पूजा सावंतच्या या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

पूजा सावंतच्या या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.

Loading...

पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. पूजा सावंतचा बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. यात पूजाने मोनोकिनी परिधान केले असून त्यावर तिने जीन्स घातली आहे. तिचा हा फोटो फोटोग्राफर तेजस नेरूरकरने क्लिक केला आहे.

Loading...

पूजाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. मात्र आता केलेले बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पूजाने ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने जंगली सिनेमातून बॉलिवूडमध्येही एंट्री केली.

Loading...

आमचे पेज लाईक करा

Editor

16 thoughts on “पूजा सावंतच्या या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

Comments are closed.