पुण्यात पंतप्रधान मोदींच्या फ्लेक्सवर लावण्यात आलं शेण

महा पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची घटना सध्या देशात वारंवार घडत आहे. तर आज पुण्यात अजून धक्कादायक प्रकार घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण लावण्यात आलं आहे.

Loading...

देहूरोड येथील बाजारपेठेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर जाणीवपूर्वक शेण लावले. ही घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पक्ष कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास निदर्शनास ही बाब आली.

त्याने तत्काळ देहूरोड शहरातील भाजपचे पदाधिकारी तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.देहूरोड शहरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष कैलास पानसरे, विशाल खंडेलवाल यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांमुळे समाजातील शांततेचा भंग केला जातो. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...