पार्टनरला जर ‘ह्या’ समस्या असतील तर अश्या प्रकारे करा मदत! 

वैवाहिक जीवनात लैंगिक संबंध महत्वाची भूमिका बजावतो.

पण अनेकदा आरोग्यासंबंधी काही समस्यांमुळे लैंगिक जीवनात अडचणी येऊ लागतात. खासकरून पुरूषांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशात आम्ही तुम्हाला पुरूषांच्या काही कॉमन लैंगिक समस्या सांगणार आहोत. आणि या समस्या पार्टनरच्या मदतीने कशा दूर करायच्या हेही सांगणार आहोत.

Loading...

पुरूषांना त्यांच्या लाइफमध्ये कधीना कधी इरेक्शनशी संबंधित समस्येचा सामना करावा लागतो. पण जर तुम्हाला नेहमीच इरेक्शनची समस्या होत असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डायबिटीस आणि हार्ट डिजीजसारख्या आजारांचा थेट प्रभाव इरेक्शनवर पडतो आणि तुम्ही इरेक्टाइल डिसफंक्शनचे शिकार होऊ शकता.त्यासोबतच स्ट्रेस, तणाव, डिप्रेशन या कारणांमुळेही इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या होऊ शकते.

अशी करा मदत

स्ट्रेस आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी महिला त्यांच्या पार्टनरची मदत करू शकतात. पार्टनरला रेग्युलर एक्सरसाइज करण्यासाठी प्रेरित करा. अल्कोहोल आणि स्मोकिंगपासून त्यांना दूर रहायला सांगा. तसेच रात्री ६ ते ७ तासांची झोप त्यांना घ्यायला सांगा.

कमी प्रमाणात कामेच्छा

कामेच्छा कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण जर हा कालावधी फार जास्त असेल तर यामागे आरोग्यासंबंधी काहीना काही समस्या असू शकते. जसे की, हाय बीपी, लठ्ठपणा, अनीमिया, डायबिटीस इत्यादी. तसेच स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यानेही कामेच्छा कमी होऊ शकते.

अशी करा मदत

आराम करून स्ट्रेस लेव्हल कमी करा आणि कामेच्छा वाढवण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे शारीरिक संबंध ठेवा. काही रिसर्चमधून समोर आले आहे की, जे कपल्स एकमेकांसोबत सेक्शुअल इंटिमसी एन्जॉय करतात, त्यांच्यात स्ट्रेस लेव्हल कमी असते आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मूडही खराब होत नाही.

प्रीमच्योर इजॅक्युलेशन

प्रीमच्योर इजॅक्युलेशन ही पुरूषांमध्ये होणाऱ्या कॉमन समस्यांपैकी एक आहे. ३ पैकी एका पुरूषाला लाइफमध्ये कधीना कधी या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येमुळे स्ट्रेस आणि तणावही येतो. पण या स्थितीत का होईल याचा काहीही नियम नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नाही तर तणाव वाढेल.

अशी करा मदत

असं होऊ शकतं की, डॉक्टर प्रीमच्योर इजॅक्युलेशन समस्या दूर करण्यासाठी काही औषधे देतील. आणि त्याने समस्याही दूर होईल. अशात औषधे वेळेवर घेण्यासाठी पार्टनरची मदत करा. सेक्स थेरपीच्या माध्यमातूनही ही समस्या दूर केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...