‘तुला पाहते रे’ मधल्या अभिनेत्रीनं पहा ग्लॅमरस फोटोशूट, घायाळ करणारे फोटोशूट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुला पाहते रेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणीने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
या मालिकेतील अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली होती. या मालिकेतील जयदीप सरंजामे आणि त्याची पत्नी देखील प्रेक्षकांना आवडली होती. जयदीपची पत्नी आणि सरंजामेंची सून म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे.तुला पाहते रे मालिका संपली असली तरी पूर्णिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.
नुकतेच तिने स्टायलिश फोटोशूट केलं असून तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.पूर्णिमाचे हे फोटोशूट शैलेंद्र परदेशीने केले असून स्टाईलिंग चैताली कुलकर्णीने केलं आहे. तर मेकअप सुरभी अणेकरने केला आहे.
पूर्णिमा तुला पाहते रे या मालिकेच्या आधी गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत झळकली होती. तसेच स्पा, कपड्यांच्या जाहिरातीसाठी तिने मॉडेलिंगही केले आहे. लवकरच ती गॅट मॅट-आम्ही जुळून देतो या सिनेमातून रूपेरी पडद्यावरही झळकणार आहे. या सिनेमातून ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
तिच्यासोबत माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच रसिका सुनीलही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पूर्णिमा ही शाहरूख खानची जबरदस्त फॅन आहे. तसंच लागीर झालं जी मालिकेतील शीतली अर्थात शिवानी तिची चांगली मैत्रीण आहे.
पूर्णिमा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिच्या खास आवाजातील गाणीही तिने आपल्या फेसबुकवर अपलोड केली आहेत.