‘तुला पाहते रे’च्या शूटिंग चा प्रवास अखेर संपला अश्या प्रकारे झाला शेवट

असे ऐकण्यात येत आहे की ‘तुला पाहते रे’ ही मालिका जुलैमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचं शूटिंगसुद्धा संपल आहे. तुला पाहते रे मालिकेमध्ये मायरा ची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेनं अश्याप्रकारची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे आणि सोबत फोटोही टाकलेत.

Loading...

अभिज्ञा भावेनं सुरुवातीला मालिकेत ग्रे शेड दाखवली होती. पण नंतर तिच्या व्यक्तिरेखेनं ईशाला मदत केली.

शूटिंगच्या वेळ केलेली सर्व धमाल मस्ती तिनं तिच्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. अभिज्ञा म्हणजेच मायरा हे कॅरेक्टर अनेक लोकांना आवडल होते. अभिज्ञा सांगते की, ‘मायरा कामात परफेक्ट आहे. ती सेल्फमेड आहे. मेहनती आहे. विक्रांतवर तिचं प्रेम असलं तरी कामात ती चोख आहे.

तिच्यामुळे कंपनीला नुकसान झालं तर ती त्याची भरपाईही करतेय. ती आयतं खात नाही. ती एथिकल आहे. तिनं विक्रांतच्या प्रगतीत स्वत:ची प्रगती पाहिलीय. त्यामुळे आताची तिची रिअॅक्शनही स्वाभाविक आहे.’ अभिज्ञा या मायराला फार जवळून ओळखते, असंच वाटत होतं.

मालिकेचा शेवट कसा होईल किव्हा कसा असेल अश्याप्रकारचे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. विक्रांत सरंजामेला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालाय. तो ईशावर खरंच प्रेम करायला लागलाय. पण तरीही ईशा त्याला धडा शिकवतेच. विक्रांत स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेतो.

ईशाने विक्रांतची सर्व माणसं तोडली.त्याला एकटं पाडलंय.

ईशाची भूमिका करणाऱ्या गायत्रीनं इंजिनियरिंग केलंय. अभिनयाची आवड होतीच काॅलेजच्या नाटकांमध्ये काम केलं होतंच. पण इथे आॅडिशन्स देऊनच ती मालिकेत आली. गायत्री अवधूत गुप्तेसोबतही एका सिनेमात काम करणार आहे. पण ‘तुला पाहते रे’ ही तिची पहिलीच मालिका.

सुबोध भावेबरोबर काम करण्याची गायत्रीची इच्छा पूर्ण झाली. ती म्हणाली होती, ‘ मी सुबोध भावेसोबत काम करतेय, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ही तुमच्या करियरसाठी सकारात्मक गोष्ट आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...