‘तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’, चंद्रकांत पाटलांनी पूरग्रस्ताला झापलं!

सत्ताधारी भाजप नेत्यांना झालंय तरी काय, असा प्रश्न पडावा इतका बेफिकीरपणा नेते आणि मंत्री करत आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचण्यास केलेला विलंब असो, प्रश्न विचारणाऱ्या टीव्ही 9 च्या अँकरला मंत्रिपदाची ऑफर असो, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सेल्फी असो किंवा मग फूड पाकिटांवरील सत्ताधाऱ्यांचे फोटो असो, सत्ताधारी मंडळी पूरग्रस्तांचा रोष पत्करुन घेत आहेत.

Loading...

या सर्व घटना ताज्या असताना, चंद्रकांत पाटील यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना, पूरग्रस्तांनी त्यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनीही तक्रार करणाऱ्या पूरग्रस्तांना झापण्यास सुरुवात केली.

‘तुम्ही तक्रारी करु नका, सूचना करा. तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पुरात बुडालेल्या पुलाची शिरोली या गावात हा प्रकार घडला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पुलाची शिरोली इथं पाणी भरल्याने अनेकांचं स्थलांतर केलं आहे. स्थलांतर केलेल्या एका शिबिरात चंद्रकांत पाटील पोहोचले. त्यावेळी ते नागरिकांना घाबरु नका, सरकार पाठिशी आहे, असं सांगत होते.

“शिरोलीमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला पार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता सरकार पाठिशी आहे याची खात्री बाळगा. हे सर्व आपण सर्व नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही, सूचना करा. प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील बोलत असताना खालून एक व्यक्ती तक्रारीच्या सुरात आपलं म्हणणं मांडत होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळं करु, सगळं करु…. त्यावेळी पुन्हा ती व्यक्त बोलू लागल्याने चंद्रकांत पाटलांचा संयम सुटला आणि ते ओरडले ये… गप्प.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...