चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केलेल्या त्या चुकीमुळे प्रथमेश परबसोबत घडलं अस काही…

मराठी अभिनेता प्रथमेश परबने ‘बालक पालक’चा विशु , तसेच ‘टाइमपास’चा दगडु सारख्या एकसे एक भूमिका पार पाडून रसिकांची पसंती मिळवली आहे.

Loading...

प्रथमेश परब आता आपल्याला आगामी ‘टकाटक’ ह्या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ‘टकाटक’ ह्या चित्रपटामधून प्रथमेश परब हा ‘गण्या’ नावाच्या प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. पण एका सीनवेळी त्याची ही एक चुक त्याला चांगलीच महागात पडली दिसत आहे.

‘टकाटक’ चितपटाच्या शूटिंग वेळी एका सीन मध्ये प्रथमेश परब ह्याला उसाचा रस प्यायचा आहे असा सिन होता. प्रथमेशने चित्रीकरणावेळी एका घोटात रस प्यायला खरा.परंतु काही कारणाव्यस्त त्या सिन चे रिटेक वर रिटेक होऊ लागले.

त्यावेळी सीन हा उत्तम असा व्हावा म्हणूम चांगला प्रथमेश प्रत्येकवेळी एका घोटात संपूर्ण रसाचा ग्लास हा एका घोटात संपवत होता. असं करता-करता प्रथमेशने लागोपाठ 8 ते 9 ग्लास उसाचा रस प्यायला. ज्यामूळे थोड्यावेळातच त्याला उलट्या सुरू झाल्या. आणि तो आजारी पडला.

याविषयी प्रथमेश म्हणाला, “हो, आम्ही खूप उन्हाळ्यात चित्रीकरण करत होतो. दूपारचे जेवण झाल्यावर आम्ही त्या सीनच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. अगोदरच माझे पोट भरले होते. त्यात लागोपाठ 8 ते 10 ग्लास रस पोटात गेल्यावर मग मात्र मला मळमळायला सुरूवात झाली. चित्रीकरण सुरू होते. म्हणून सुरूवातीला मी काही बोललो नाही. पण नंतर मात्र माझ्या उलट्या सुरू झाल्या आणि मी आजारी पडलो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...