‘चला हवा येऊ द्या’ मधील अंकुर वाढवे अडकला विवाहबंधनात ! पहा फोटो

महाराष्ट्राचा लोकप्रिय असा शो ‘चला हवा येऊ द्या’ शोमधील अंकुर वाढवे हा विवाहबंधंनात अडकला आहे. शुक्रवारी 28 जूनला अंकुरचा लग्नसोहळा हा पार पडला. यवतमाळमध्ये अंकुरने कोर्ट मॅरेज केलं आहे.चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या अंकुर वाढवेचा रिसेप्शन सोहळा त्याच्या विदर्भातील पुसद या राहत्या गावी होणार आहे.

Loading...

चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या अंकुर वाढवेचा रिसेप्शन सोहळा उद्या 30 जूनला विदर्भातील पुसद या त्याच्या राहत्या गावी होणार आहे.सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस ,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या दमदार नाटकात त्याने भूमिका साकारल्या आहेत.

‘जलसा’ या मराठी चित्रपटालाही तो एक भाग बनला. पुढे चला हवा येऊ द्या मध्ये छोटूच्या भूमिकेसाठी त्याची वर्णी लागली आणि अंकुर प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोहोचला.डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, योगेश सिरसाट या विनोदी कलाकारांसह अंकुर देखील या शोचा महत्वाचा भाग बनला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील एक महत्वाचं पात्र आहे अंकुर वाढवे.शरीराची उंची जरी कमी असली तरी त्याच्या अभिनयाच्या उंचीचे कौतुक अनेक दिग्गज अभिनेत्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...