घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?, खुद्द सांगितलं मलायकानं

मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले.
हे वृत्त ज्यावेळी त्यांच्या चाहत्यांना समजलं त्यावेळी त्यांना धक्का बसला. मात्र त्यांच्यातील वाद किंवा घटस्फोटाचं कारण दोघांनीही सांगितलं नाही. आता घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच मलायकानं काही गोष्टी शेअर केल्या. ती करीना कपूरच्या रेडिओ चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती.
करीनाने चॅट शोमध्ये मलायकाला घटस्फोटोबद्दल विचारलं असता ती म्हणाली की, जेव्हा माझ्या घटस्फोटाबद्दल मी फ्रेंड्स व घरातल्यांशी बोलले तेव्हा सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितला होता. ज्या व्यक्तींचं माझ्यावर प्रेम आहे, ज्यांना माझी काळजी आहे ती प्रत्येक व्यक्ती मला असाच सल्ला देणार याची मला कल्पना होती.
कोणीही मला उत्स्फूर्तपणे हा घे घटस्फोट.. फार विचार करू नकोस असं म्हणणार नव्हतं.मलायका पुढे म्हणाली की, ‘घटस्फोटाच्या आदल्या रात्री मी माझ्या कुटुंबासोबत बसले होते.
सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करायला सांगितला. जर तुझा हा अंतिम निर्णय असेल तर आम्हाला तुझा अभिमान आहे. आमच्या दृष्टीने तू एक कणखर महिला आहेस.
करिनाने यानंतर मलायकाला प्रश्न विचारला की, नातं तुटल्यावर कसं वाटतं? दुसरं नातं जोडलं जाऊ शकतं का? याचं उत्तर देताना मलायका म्हणाला की, हो का नाही. पहिलं नातं संपल्यावर पुढे जाणं फार गरजेचे असते. तुम्हाला तुमचा वेळ मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमचा बेड कोणासोबत शेअर करावा लागत नाही.