केस गळती व टक्कल घालविण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

केस गळती व टक्कल घालविण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून सुरू झाली आहे. खानपान आणि जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये दिसून येते.

Loading...

केस कमी झाल्याने तुम्ही लवकरच वयस्क झाल्यासारखे वाटतात. आजकाल वैज्ञानिक पद्धतीने हेअर टान्सप्लान्टेशन, स्टेम सेल, लेझर ट्रीटमेंट आणि हेअर विविंग करून टक्कलावर उपचार केले जातात. उंदरांवर प्रयोग करून लक्षात आले की टक्कलावर उपचार करण्यासाठी जीन आधारीत थेरेपी शक्य आहे. तसेच त्यांनी अशा जीनचा शोध लावला आहे ज्याने केस गळणे कमी होते. हे जीन प्रोटीनचे सर्क्युलेशन वाढवते, त्यामुळे केस वाढण्यात मदत होते. या संदर्भात शोधकर्ता डॉ. जॉर्ज कोस्टारेलिस यांनी दावा केला की टक्कलाची समस्या कायमची दूर होऊ शकते. टक्कलाचा इलाज आहे. केस गळण्याची समस्या डोक्यातील छोटे ऑर्गन खराब होतात, त्यामुळे होते.

पण आम्ही तुम्हांला सांगतो टक्कलाला दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय.

Loading...

१) मेथी आणि दही

Loading...

टक्कलाचा उपचार करण्यासाठी मेथी खूप उपयोगी आहे. मेथीला एका रात्री पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करा. मेथी आणि दहीची पेस्ट केसांच्या मुळाजवळ लावला. एक तास ठेवा. असे केल्यास केसांची मूळाशी असलेला कोंडा कमी होतो. तसेच डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही. मेथीत निकोटिनिक अॅसीड आणि प्रोटीन असते. जे केसांना पोषण देते. तसेच केसांची वाढ करते.

२) उडदाची डाळीचा लेप

Loading...

उडदाची बिन सालाची डाळ उकडून मिक्सरमधून बारीक करा. रात्री झोपण्यापूर्वी त्याचा लेप तयार करून केसांच्या मूळांशी लावा. कपडे खराब होऊ नये म्हणून डोक्याला टॉवेल बांधून ठेवा. असे काही दिवस केल्यास हळूहळू केस उगायला लागतील. तुमचे टक्कल कमी होईल.

३) ज्येष्ठमध आणि केसर

ज्येष्ठमधाला वाटून घ्या त्यात थोडे दूध आणि केसर मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी ते डोक्याला लावा. सकाळी उठून केस शॅम्पूने धूऊन टाका. हळूहळू टक्कल कमी होईल.

४) कोथिंबीरचे पेस्ट

कोथिंबीरचे पेस्ट बनवून डोक्याच्या त्या भागाला लावा ज्या ठिकाणी टक्कल पडले आहे. असे लागोपाठ एक महिने केल्यास पुन्हा केस येण्यास सुरूवात होईल.

५) केळी आणि लिंबू

एक केळ्यात लिंबूचा रस मिक्स करून ते एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या. ती डोक्याला लावा. केस गळण्याची समस्या दूर होईल. असे केल्यास टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस येतील.

६) कांदाही उपयोगी

एका मोठा कांदा घेऊन तो दोन भागात कापून घ्या. ज्या भागात केस गळाले आहेत. त्या ठिकाणी एक भाग पाच मिनिटांपर्यंत रगडा. लागोपाठ काही दिवस केल्यास केस गळणे बंद होईल आणि पुन्हा केस येण्यास सुरूवात होईल.

admin

49 thoughts on “केस गळती व टक्कल घालविण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *