काय आहे महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात? नक्की वाचा !!

काय आहे महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात? नक्की वाचा !!
 • अरबी समुद्रातील शिवस्मारक ३६ महिन्यांमध्ये पूर्ण होणार
 • शिवस्माराकासाठी ३०० कोटींची तरतूद
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमीलचा ताबा राज्य शासनाने घेतला आहे
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद केली जाणार आहे
 • १७ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गासाठी मंजूर करण्यात आली आहे
 • १ लाख कोटी रूपयांच्या (अंदाजे) मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे
 • सूतगिरण्यांना प्रति युनिट ३ रूपये दराने वीज देण्यात येणार
 • वीजेवर चालणाऱी वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना विशेष प्रोत्साहन देणार
 • महिला उद्योजकांची संख्या ९ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज
 • सिंचनाची क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे
 • ५० अपूर्ण सिंचन प्रकल्प या वर्षी पूर्ण करण्याचा संकल्प आहे
 • जलयुक्त शिवारासाठी १५०० कोटींचा विशेष निधी प्रस्तावित आहे
 • अडअडचणी कितीही येऊ, आम्ही शेतकऱ्यासोबत राहू अशा कवितेच्या ओळी अर्थमंत्र्यांनी ऐकविल्या
 • शेतकऱ्यांचे उत्पन् दुप्पट करण्याचे शासनाने ठरविले आहे
 • सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगळी योजना प्रस्तावित असून त्यासाठी १०० कोटींची तरतूद अपेक्षित आहे
 • आंबा,काजू उत्पादकांसाठी १०० कोटींची तरतूद करणार
 • छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या न्याय मार्गावर आमची वाटचाल सुरू आहे-अर्थमंत्री
 • ६ मार्च २०१८पर्यंत ३५.६८ लाख खातेधारकांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे
 • राज्यातील समृद्धी महामार्गालगत, गोदामे,शीतगृहे बांधण्यात येणार आहे. एस.टी.महामंडळामार्फत मालवाहतुकीची नवीन सेवा सुरू करण्याची योजना आहे
 • एस.टी मुळेनाशवंत माल कमी दरात लवकर बाजारात पोहचू शकेल
 • ६०९ एस.टी स्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी ४० कोटींची तरतूद
 • स्टार्टअप धोरण २०१८ राबविणार
 • उच्चशिक्षण घेतलेल्या पदवीधर तरूणांचे राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षेत टक्का कमी आहे, हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार, यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात येणार
 • महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले जाणार
 • आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज योजनेसाठी ६०५ कोटींचा निधी प्रस्तावित. योजनेअंतर्गत असलेल्या कोर्सेसची व्याप्तीही वाढवणार
 • आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज योजनेअंतर्गत शिक्षणशुल्काची मर्यादा ६ लाखांऐवजी आता ८ लाख केली
 • मुंबईमध्ये २६६ किमी मार्गाच्या मेट्रो मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. ७६४२१ कोटी इतकी या प्रकल्पाची अंदाजे किंमत आहे. हे प्रकल्प ३-४ वर्षात पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे
 • मुंबईतील मेट्रोसाठी १३० कोटींची रकमेची तरतूद
 • मुंबईमध्ये MMRDA च्या सहभागातून २६६ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गाच्या आराखड्यास मंजूरी. ६७ लाख प्रवाशांना दररोज वातानुकूलित, सुरक्षित व आरामदायी प्रवासाचे फायदे
 • महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या नावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे अध्यासन केंद्र
 • थोर महापुरुषांचे साहित्य सहज उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट. सर्व साहित्य वेबपोर्टलद्वारे प्रकाशित करण्याचा मानस
 • महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (MIEB) असे नवीन मंडळ स्थापन करणार
 • मानव विकास मिशनसाठी रु.३५० कोटी एवढा नियतव्यय
 • प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत २ लाख ८४ हजार ६२७ उमेदवारांना प्रशिक्षण. ८५ हजार ५४९ उमेदवारांना रोजगार किंवा स्वंयरोजगार उपलब्ध
 • ३१ मार्च, २०१४ रोजी राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५८५८ कि.मी. होती त्यात वाढ झाली ती सध्या १५४०४ कि.मी आहे
 • वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूच्या रु.७ हजार ५०२ कोटी किंमतीच्या कामास मंजूरी
 • सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील रस्ते विकासासाठी रु.१० हजार ८२८ कोटी
 • ३१ मार्च, २०१४ रोजी राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५८५८ कि.मी. होती त्यात वाढ झाली ती सध्या १५४०४ कि.मी आहे
 • सन २०१८-१९ मध्ये सुमारे ७ हजार कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, त्यासाठी रु. २ हजार २५५ कोटी
 • सर्व अकृषिक विद्यापिठात एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन पद्धती सुरू करणार
 • मिहान सन २०१८-१९ करता रु.१०० कोटींची तरतूद
 • ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा व अन्य बाबींकरता ७ हजार २३५ कोटी रू. निधीची तरतूद
 • महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबई बंदर न्यास आणि सिडको ह्यांच्या सहकार्याने भाऊंचा धक्का ते मांडवा, अलीबाग दरम्यान प्रवासी जलवाहतूक सेवेचा आरंभ एप्रिल २०१८ मध्ये होणार
 • न्यायालयीन इमारतींच्या बांधकामासाठी ७०० कोटी ६५ लक्ष रू. निधीची तरतूद
 • विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र ह्या भागातील डी व डी उद्योगांना दिल्या जाणा-या वीज दरामध्ये सवलतीसाठी ९२६ कोटी ४६ लक्ष रू. निधी प्रस्तावित
 • मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गत ४० लाख शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देणार, ग्रीन सेस फंडासाठी रू. ३७५ कोटी निधीची तरतूद
 • समुद्र किनाऱ्यावरील घारापुरी लेण्यांत ७० वर्षांत प्रथमच वीज पोहोचविण्यात शासनाला यश
 • अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस दलाचे आधुनिकीकरण व बळकटीकरण ह्यासाठी १३ हजार ३६५ कोटी ३ लक्ष इतकी भरीव तरतूद
 • संत्रा प्रक्रिया उद्योगांतर्गत संत्र्याची उत्पादकता व दर्जा वाढविण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला ह्या तीन जिल्ह्यांत पंजाब राज्याप्रमाणे “सिट्रस इस्टेट” ही संकल्पना राबविणार. त्यासाठी १५ कोटी इतक्या रू. निधीची तरतूद
 • पोलिस ठाणे व त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर योग्य देखरेख व नियंत्रण राहण्यासाठी सर्व पोलिस ठाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडल्या जाणार. ह्यासाठी १६५ कोटी ९२ लक्ष रू. निधीची तरतूद
 • भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान तसेच विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सांगली मार्डी, जि. उस्मानाबाद ह्यांच्या मार्फत केल्या जात असलेल्या कौशल्य विकासाच्या कामासाठी प्रत्येकी रू.२ कोटींचे अनुदान
 • मातीकला कारागीरांचा विकास व रोजगार निर्मितीसाठी संत गोरोबाकाका महाराष्ट्र माती कला बोर्ड वर्धा येथे स्थापन करणार. ह्यासाठी १० कोटी रू. निधीची तरतूद
 • विविध हस्तकला कारागिरांची क्षमतावृद्धी करून हस्तकलेचा विकास करण्याचा निर्णय. ह्यासाठी ४ कोटी २८ लक्ष रू. निधीची तरतूद
 • काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने शाश्वत व पर्यावरण पूरक काथ्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन ह्यासाठी १० कोटी रू. निधीची तरतूद
 • मॅग्नेटिक महाराष्ट्रअंतर्गत देशांतर्गत व परकीय गुंतवणूकदारांकडून ४ हजार १०६ सामंजस्य करार प्राप्त. ह्याचे मूल्य रू. १२ लाख १० हजार ४६४ कोटी असून सुमारे ३७ लक्ष इतका रोजगार अपेक्षित
 • भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान तसेच विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सांगली मार्डी, जि. उस्मानाबाद ह्यांच्या मार्फत केल्या जात असलेल्या कौशल्य विकासाच्या कामासाठी प्रत्येकी रू. २ कोटींचे अनुदान
 • संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही योजना राबविण्यासाठी २० कोटी रू. निधीची तरतूद
 • हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रू. निधीची तरतूद
 • बक्षी समितीचा अहवाल आल्यानंतरच सातवा वेतन आयोग
 • सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये अंदाजे २० कोटी रू. किमतीचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करणार
 • माता व बाल मृत्युचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधान मंत्री मातृवंदना योजनेसाठी ६५ कोटी रू. निधीची तरतूद
 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानासाठी ५७६ कोटी ५ लक्ष रू. निधीची तरतूद
 • केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ९६४ कोटी रू. निधीची तरतूद
 • अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी दरवर्षी ५०लाखाचे अनुदान मिळणार. यासाठी तीन कोटी राखून ठेवण्यात आले
 • राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे वाचन पूर्ण केले

 

Loading...

admin

24 thoughts on “काय आहे महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात? नक्की वाचा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *