औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं

राज्यातील जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 25 किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल व डेस्टीनेश वेडींगचा निर्णय घेणा-या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

Loading...

मिर्झाराजे जयसिंगासोबत जेव्हा राजांनी तह केला तेव्हाही जेमतेम वीस किल्ले देऊ केले होते. औरंगजेबाला त्याच्या हयातीत एकही किल्ला जिंकता आला नव्हता, मात्र दुर्देवाने म्हणावे लागेल की, औरंगजेबाला त्याच्या हयातीत जमलं नाही ते सरकारने पाच वर्षात हा निर्णय घेऊन करुन दाखविले आहे.

ज्या राजस्थानच्या किल्ल्यांचा या निर्णयात उल्लेख केला आहे, ते निवासी किल्ले होते, महाराष्ट्रातील किल्ले हे युध्द किल्ले आहेत. हा फरक समजून घ्यायला हवा.

वारंवार डेस्टीनेशन वेडींग असा जो उल्लेख केला जातो, तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊच दिला जाणार नाही आणि जरी केला तरी येथे डेस्टीनेशन वेडींगसाठी नेमके कोण येणार आहे, जी उच्चभ्रू मंडळी येथे डेस्टीनेशन वेडींग करतील त्या पैकी किती जणांना आपल्या जाज्वल्य इतिहासाबाबत चाड आणि भान असणार आहे याचा सरकारनेही विचार करायला हवा.

दरम्यान, ज्या मातीवर मावळ्यांनी बलिदान पत्करले होते, तेथे डेस्टीनेशन वेडींगचे सोहळे रंगणार असतील तर सरकारने नक्की याचा पुन्हा विचार करायला हवा.विकासाला विरोध नाही, येथे संग्रहालय शिवसृष्टी उभारायला विरोध नाही, पण डेस्टीनेशन वेडींगसाठी ऐतिहासिक किल्ल्यांचा उपयोग होता कामा नये, असे अमोल कोल्हे यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...