ओळखल का या चिमुकलीला; सध्या आहे मराठीतील टॉपची अभिनेत्री

ओळखलंत का या चिमुकलीला? आता ती मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.ही अभिनेत्री आहे ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘ती सध्या काय करते’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या भूमिका पार पाडलेली आणि विशेषत: ‘होणार सून मी या घरची’ असं म्हणत मालिकेतून सहा सासवांसोबत आपल्या कुटुंबाला हसत खेळत पुढे घेऊन जाणारी जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान.
तेजश्री सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत एका विवाहित महिलेची भूमिका साकारत आहे. शुभ्रा असं तिच्या भूमिकेचं नाव असून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.
‘होणार सून मी या घरची’ ही मालिका संपल्यानंतर छोट्या पडद्यावर तेजश्रीचे दर्शन रसिकांना घडले नाही. त्यामुळे रसिक तिला पाहण्यासाठी आतुर होते. ब्रेकनंतर तिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.
तेजश्रीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांतून आपल्या सृजनशील अभिनयाची ओळख पटवून दिली आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या तेजश्रीने ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून पदार्पण केलं. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती.